Marathi Mother Tongue Agrowon
ॲग्रो विशेष

Marathi Abhijat Bhasha : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतला निर्णय

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केंद्र शासनाकडून गुरूवारी (ता.३) करण्यात आली. ही घोषणा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाची झालेल्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मराठी भाषेसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाने केली होती. अनेकदा मागणनी करूनही याबाबत निर्णय झाला नव्हता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घोषित करण्यात आला. या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची गोड बातमी दिली आहे. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी, कन्नड, तेलुगु, मल्याळमनंतर आता बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला आहे. याबाबत आमच्याकडे नोटिफाईड आले होते. त्यावर फ्रेम वर्क झाल्याची, प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव यांनी दिली.

यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी, माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! असे ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार मानत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी, आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने मनापासून आभार मानत असल्याचे म्हटले आहे.

तसेच हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. याकामात अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT