Jowar Market Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Market : बुलडाणा जिल्ह्यात ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण

Jowar Rate : हजारो शेतकऱ्यांचा शेतीमाल घरात तसाच पडून

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Buldana News : बुलडाणा ः आधारभूत किमतीने ज्वारीची खरेदी करण्यासाठी जिल्ह्याला ३३ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आलेले असून ते पूर्ण होत आले आहे. ऑनलाइन नोंदणीपैकी १० टक्के शेतकऱ्यांचीही ज्वारी अद्यापपर्यंत खरेदी झालेली नसून हजारो शेतकरी ज्वारी खरेदी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत या रब्बी हंगामात उत्पादित झालेली ज्वारी, मक्याची शासनामार्फत खरेदी सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यात यासाठी २० केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली. या केंद्रांवर रब्बी ज्वारीची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ८ ते ३१ मे अशी मुदत दिली होती. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर या २० केंद्रांना ३० हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. तसेच तीन हजार वाढीव उद्दिष्ट खरेदीसाठी देत ३३ हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ज्वारी पेरा बघता या केंद्रांवर झालेली नोंदणी व प्रत्यक्षात खरेदी यामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्याला ३३ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट आहे. याच्या १० पट उत्पादन जिल्ह्यामध्ये झाल्याचे समजते. त्यामुळे ज्वारी विक्रीसाठी १३ हजारांवर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. प्रत्यक्षात मात्र १० टक्के शेतकऱ्यांची ज्वारी दिलेल्या उद्दिष्टात संपली. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी केलेल्या इतर शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीक पेऱ्यानुसार जिल्ह्याला ३ लाख ७४ हजार क्विंटलचे उद्दिष्ट आवश्यक होते. १३ हजार ४८९ शेतकऱ्यांपैकी जवळपास हजार शेतकऱ्यांकडून २८ हजार ९८७ क्विंटल ज्वारी खरेदी केली. रब्बी ज्वारीसाठी हमीभाव ३ हजार १८७ रुपये आहे. तर बाजारपेठेत ज्वारी अवघी १८०० ते २२०० पर्यंत विकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय खरेदीची प्रतीक्षा आहे.

लोकप्रतिनिधींना गांभीर्य नाही
ज्वारी खरेदीच्या मुद्यावर उत्पादक चिंतातूर झालेला आहे. शेजारच्या अकोला, अमरावती या दोन जिल्ह्यांना गेल्याच आठवड्यात ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढून मिळाले. तेथील प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पणन विभागाने ही वाढ केली. बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना अद्यापही या विषयाचे गांभीर्य वाटलेले नाही. त्यामुळे या जिल्ह्याचे उद्दिष्ट वाढविण्यात आलेले नाही. उदासीनतेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT