Pune Farmer Success  Agrowon
ॲग्रो विशेष

Bitter Gourd Farming: शेणखत वापरामुळे कडू कारल्याची वाढली ‘गोडी’

Pune Farmer Success: खुटबाव (ता. दौंड) येथील प्रमोद ताकवणे यांनी शेणखत, ठिबक सिंचन, मल्चिंग आणि नियोजनबद्ध शेतीच्या जोरावर केवळ २० गुंठ्यांत कारल्याचे दोन टन उत्पादन घेतले. पहिल्याच महिन्यात ७० हजार रुपयांचा नफा मिळवून त्यांनी शेतीत यशस्वी प्रयोग केला आहे.

Team Agrowon

Pune News: दौंड तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी प्रमोद दत्तात्रेय ताकवणे यांनी २० गुंठ्यांत कारल्याचे आतापर्यंत दोन टन उत्पादन घेतले आहे. शेणखत वापरल्याने उत्पादनात वाढ झाली. गेल दीड महिन्यात कारल्याचे ६ तोडे झाले. त्यास प्रतिकिलो सरासरी ५० रुपये बाजारभाव मिळत आहे. पहिल्याच महिन्यामध्ये ताकवणे यांना खर्च वजा जाता ७० हजार रुपयांचा नफा मिळाला.

प्रमोद ताकवणे यांनी प्रथमतः शेतीची मशागत केली. सहा बाय सहा फूट अंतरावर पट्टा पद्धतीने सरी काढली. प्रत्येक सरीमध्ये शेणखत त्याचबरोबर रासायनिक भेसळचा डोस दिला. प्रत्येक रोपाला पाणी मिळावे म्हणून ठिबक सिंचन संच जोडून घेतले. त्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून घेतले. सर्वातं शेवटी एका नामांकित कंपनीचे कारल्याचे बियाणे टोपण करून कारल्याची लागवड केली.

उगवण झाल्यानंतर दोन वेळा आळवणी केली. कारल्याचे वेल तयार झाल्यानंतर तार व काठीच्या साह्याने प्रत्येक वेल बांधण्यात आला. कारल्याचा प्रत्येक वेल बांधला गेल्याने शेतीमध्ये मंडप तयार झाला. या मंडपावर पुन्हा सर्व वेल पसरून दिले. दर आठवड्याला नियमित वारंवार औषधे फवारणी करण्यात आली. योग्य नियोजन केल्यामुळे योग्य उत्पादन मिळाले असल्याचे श्री. ताकवणे यांनी सांगितले.

गुलटेकडी, यवत, केडगावात विक्री

तयार मालाची गुलटेकडी मार्केट पुणे व परिसरातील पारगाव, यवत, केडगाव येथील आठवडे बाजारात विक्री केली जात आहे. या कामी घरकाम सांभाळून आई मंदाकिनी आणि पत्नी अर्चना यांची ताकवणे यांची कारले तोडणीसाठी प्रमोद यांना मोलाची साथ मिळत आहे. कृषी पदवीधर समीर जेधे यांनी ताकवणे यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन लाभले.

लहान वयातच कौटुंबिक जबाबदारी अंगावर पडल्याने शाळा लवकर सुटली. घरची शेती असल्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीस पडीक असणारी शेती बागायती केली. दूध व्यवसाय तसेच ऊस, वांगे, दोडका, काकडी, टोमॅटो आदी पिके घेतली. अलीकडील काळात हायटेक व आधुनिक शेती करत आहे. कुटुंबाची साथ मिळाल्याने शेती यशस्वी करू शकलो याचे समाधान आहे.
प्रमोद ताकवणे, कारले उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT