Dahi handi  Agrowon
ॲग्रो विशेष

Dahi Handi 2024 : राज्यातील गोविंदांना मिळणार १० लाखांच्या विम्याचे कवच! २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मूदत

Insurance Coverage to Govinda in Dahi Handi : राज्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीला दहीहंडी साजरी केली जाते. तसेच ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरूण, तरूणी मानवी मनोरे उभे करतात.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमिवर राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाते. या उत्सवात मोठ्या संख्येने तरूण आणि तरूणी सहभागी होतात. दहीहंडी फोडण्यासाठी उंचच्या उंच मानवी मनोरे तयार केले जातात. यात काहीवेळी दुर्घटना घडते.

ज्यात अंपगत्व आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गोविंदांना अंपगत्व आले असून काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. यावरून राज्य सरकराच्या क्रीडा विभागाकडून गोविंदांना विमा संरक्षण दिले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

त्याप्रमाणे राज्य सरकारने गोविंदांना विमा कवच दिले असून राज्य सरकारने गोविंदांसाठी १० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू केले आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव असून याआधी राज्य सरकारने विमा संरक्षणाची घोषणा केली आहे. तसेच २४ ऑगस्टपर्यंत विमा संरक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.

राज्य सरकराच्या क्रीडा विभागाने केलेल्या आदेशानुसार या निर्णयाचा लाभ राज्यातील ७५ हजाराहून अधिक गोविंदांना होणार आहे. तर दहीहंडी फोडताना दुर्घटनेत हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे.

७५ हजार गोविंदांचा विमा

राज्यातील ७५ हजार गोविंदांचा विमा उतरवण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना १० लाख आणि एक हात, एक पाय किंवा डोळा गमावल्यास ५ लाख असा विम्याचा लाभ देण्यात येईल असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या गोविंदांवर उपचारासाठी जास्तीत जास्त १ लाख खर्च केला जाणार आहे.

दरम्यान सरकारच्या या निर्णयाला दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) आक्षेप घेतला आहे. मात्र याकडे कानाडोळा करत महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने मुंबईसह राज्यातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्यास सुरुवात केली आहे.

तसेच राज्यातील गोविंदांनी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरावेत, असे आवाहन देखील महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे. तर या विमा संरक्षण योजनेचा कालावधी १४ ऑगस्टपासून ते २८ ऑगस्ट ६ वाजेपर्यंतच असणार आहे.

विमा संरक्षणासाठी काय करावे लागेल?

राज्य सरकारच्या विमा संरक्षणासाठी गोविंदा पथकाने मंडळाचे विनंती पत्र, सर्व गोविंदांची नावे, वय व मोबाईल क्रमांक असलेले विनंती पत्र स्कॅन करून gi.mrdga@gmail.com या ई – मेल आयडीवर अपलोड करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT