Dhananjay Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance News : अग्रीम पीक विम्याचा मार्ग मोकळा, विम्या कंपन्यांना हप्त्यापोटी ६२८ कोटी रुपये मंजूर

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के अग्रीम पीकविमा मिळण्यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्यांना ६२८ कोटी रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil Shinde

Pik Vima 2023 : खरीप हंगामात अनेक जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम पीक विमा देण्याची मागणी होत आहे. यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्याना शेतकऱ्यांच्या हिश्श्याच्या हप्त्याचे ६२८ कोटी रुपये वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.

यंदा माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिली आहे. जमिनीत ओलावाच नसल्याने पिके वाळून गेली. तर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात बुडाल्याने सोयाबीनच्या पिकावर 'येलो मोझ्याक' हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम पीक विमा देण्याची मागणी होत आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला पावसाचा २१ दिवसांचा खंड असल्यास पंचनामे करून अग्रीम पीक विमा देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत मदत करण्याचे निर्देश दिले होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने यंदा सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फक्त १ रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला. या योजनेत राज्यभरातील १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.

खरीप हंगाम २०२३ साठी राज्याचा हिस्सा १२६५ कोटी ७५ लाख रुपये विमा कंपन्याना वितरीत होते. त्यानंतर आज राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिश्शाचे १०३४ कोटी ६० लाख रुपयांपैकी ६२८ कोटी ४३ लाख ४३ हजार ५४२ रुपये विमा कंपन्यांना जमा करण्याची मंजूरी दिली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामुळे खरीप हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साधारणत: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीक विमा देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT