Pune News : काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील कसब्याचे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील शासकीय जमिनीवरून थेट महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर आरोप केले होते. या आरोपावरून वातावरण तापले असतानाच आता राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील राज्य शेती महामंडळाची जमीन फुकटात शिर्डी संस्थानला देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या निर्णयाला वित्त विभागाने विरोध करताना जमीनचा मोबदला घेऊनच संस्थानला देण्यात यावा, असा शेरा विभागाने मारला होता.पण महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने शिर्डी संस्थानला १३ कोटी ७० लाख रुपयांची जमीन मोफत मिळाली आहे. यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे.
राहता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथील शेती महामंडळाची ५.४८ हेक्टर जमीन राज्य सरकारने जून २०२३ मध्ये ग्रामपंचायतीला दिली होती. ती ५.४८ हेक्टर जमीन शिर्डीच्या साईबाबा संस्थानला मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर हा निर्णय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आग्रहाखातर थेट मोफच देण्यात आल्याचा आरोप आता केला जात आहे.
महसूलमंत्री विखे पाटील यांच्या, शिर्डीत सुसज्ज क्रीडा संकुलाची उभारणी करण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानेनं जागेची मागणी केली होती. यासाठी राज्य सरकारने जून २०२३ मध्ये महामंडळाची ५.४८ हेक्टर जमीन ग्रामपंचायतीला दिली होती.
यानंतर सदरची जागा मंजूर योजनेसाठी योग्य नसून ती महामंडळास परत करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले होते. यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये पुन्हा या जागेवरून नवा प्रस्तावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
ज्यात सदर जमीन साईबाबा संस्थानला प्रचलित बाजारमूल्यानुसार (रेडीरेकनर) देण्यात यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तर बाजारमूल्यानुसार या जमिनीची किंमत १३ कोटी ७० लाख रुपये झाली होती. ही रक्कम घेऊन जमीन साईबाबा संस्थानला क्रीडा संकुल उभारण्यासाठी देण्याचा ठराव राज्य शेती महामंडळाने केला होता. तसा प्रस्तावही महसूल विभागास पाठवला होता.
याच प्रस्तावावर वित्त विभागाने जमीन मोफत न देता राज्य शेती महामंडळाच्या ठरवाप्रमाणे विकत देण्यात यावी. महामंडळाच्या प्रस्तावाप्रमाणे संस्थानने १३ कोटी ७० लाख रुपये घ्यावेत. या व्यवहारात पैसे न दिल्यास सरकारचे मोठे नुकसान होईल, असे म्हणत वित्त विभागाने विरोध दाखवला होता.
मात्र महसूलमंत्री विखे पाटील यांनी, शिर्डीत साईबाबा संस्थानने क्रीडा संकुलाची उभारणी केल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन येथे करणे शक्य होईल.
यामुळे शेती महामंडळाची जागा संस्थानला मोफत देण्याचा नवा प्रस्ताव मंत्रिमंळासमोर सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता राज्य शेती महामंडळ आणि वित्त विभागाचा विरोध डावलून ही जमीन शिर्डी संस्थानला मोफत देण्यात आली आहे.
धंगेकर यांचा आरोप
पुण्यातील शासकीय जमिनीवरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर आरोप केले होते. धंगेकर यांनी विखे पाटील यांच्या आशीर्वादाने पुण्यातील २०० कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
तर मावळ तालुक्यातील चांदखेड गावातील ३१ एकर जमिनीवरून आरोप केले होते. सचिन शिंदे आणि श्वेता आचार्य हे विखे पाटील यांचे निकटवर्तीय असून ते सरकारची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.