Agriculture Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Issue : ‘भराव हटाव...शेती बचाव’चा कागलमधील शेतकऱ्यांचा नारा

Farmer Demand : पुलांच्या भरावामुळेच मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली बुडाली. त्यामुळे पुलांच्या बाजूचे भराव काढून त्या ठिकाणी तेवढ्याच उंचीचे पिलर उभारून पाणी जायला मार्ग करावा.

Team Agrowon

Kolhapur News : कागल तालुक्यातील वेदगंगा-दूधगंगा नदीवरील सर्वच बंधारे आणि पुलांवर महापुराचे पाणी आले. तर काही पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्त्यावर पाणी आले. नदीवर पूल बांधताना दोन्ही बाजूंना टाकलेल्या भरावामुळे तालुक्यात तब्बल २ हजार हेक्टरमधील पिके दहा दिवस पाण्याखाली राहिली.

पुलांच्या भरावामुळेच मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली बुडाली. त्यामुळे पुलांच्या बाजूचे भराव काढून त्या ठिकाणी तेवढ्याच उंचीचे पिलर उभारून पाणी जायला मार्ग करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

वेदगंगा नदीकाठावरील शेतकरी ‘भराव हटाव...शेती बचाव’ या टॅगलाइनखाली आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. गत वर्षी पावसाळ्यात केवळ दीडशे हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. या वर्षी १३ ते १४ पट जादा क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पूररेषेच्या आत भरावा, बांधकाम अशा पद्धतीची कामे करायची नसताना इमारती देखील उभारल्या गेल्या आहेत.

धरण जुलैमध्ये ५० टक्केच भरायचे असा नियम असताना सर्व धरणे १०० टक्के भरून घेण्यात आली आहेत. धरणातून विर्सग आणि संततधार पावसामुळे नदीकाठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा वेळी दक्षता व गुणनियंत्रण कक्ष काय करतो? हा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.

तालुक्यात नदीकिनारा, बानगे, बस्तवडे, बाचणी, मुरगूड-वाघापूर, नानीबाई चिखली अशा सर्वच ठिकाणी पाणी आल्याने मार्ग बंद झाले. या ठिकाणी पूलांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. हे पूल, बंधारे बांधताना भरावाच्या ठिकाणी पिलर उभारून पाणी जाण्यासाठी मार्ग केलेले नाहीत.

मुरगूड-निढोरी मार्गावर चार ते पाच फूट पाणी येते या ठिकाणी तेवढ्याच उंचीचे पिलर उभा करणे आवश्यक आहे. कागलमध्ये नागोबाचा ओढा व तहसील कार्यालय समोरील बोगद्यात नेहमीच पाणी साचते, याकडेही दुर्लक्ष आहे. बाचणी येथील १० कोटींचा पूल पूर्ण होण्यापूर्वीच पुरात बुडाला आहे. पुरामुळे शेतकरी, माल वाहतूक, शिक्षण आणि नोकरदार यांचे नुकसान दरवर्षी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT