Vermicompost  Agrowon
ॲग्रो विशेष

Vermicompost : गांडूळ खत तयार करण्याची शास्त्रिय पद्धत

Organic Fertilizer : गांडूळ खत तयार करताना जागेची निवड, शेड, बेड किंवा खड्ड्यामध्ये योग्य थरांमध्ये पदार्थांची भरणी याकडे लक्ष द्यावे. गांडूळ खत तयार करताना शेण, शिल्लक वैरण, काडीकचरा, पिकांची धसकटे अर्धवट कुजलेली असावीत.

Team Agrowon

Organic Farming : गांडूळ खत तयार करताना जागेची निवड, शेड, बेड किंवा खड्ड्यामध्ये योग्य थरांमध्ये पदार्थांची भरणी याकडे लक्ष द्यावे. गांडूळ खत तयार करताना शेण, शिल्लक वैरण, काडीकचरा, पिकांची धसकटे अर्धवट कुजलेली असावीत. जमिनीच्या पृष्ठभागावर गादी वाफा तयार करावा. खड्डा करण्याची गरज नाही.

जमिनीवर सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा (पाचट, धसकट इ.) २-३ इंच जाडीचा थर घालावा. त्यामध्ये गांडुळे सोडावीत. नंतर हा गादीवाफा गोणपाटाने झाकून घ्यावा. वाफ्याचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत मर्यादेत ठेवावे. सामू ६.५ ते ७.५ असावा. ४५ ते ५० टक्के ओलावा असावा. वाफ्यातील मातीची ढेकळे हाताने फोडावीत व आठवड्यातून एकदा वाफ्यातील कचरा खाली-वर करावा.

या पद्धतीने महिना- सव्वा महिन्यात चहाच्या पावडरसारखे खत तयार होईल. हे तयार खत वेगळे करावे. तयार झालेले खत काढण्यापूर्वी गांडुळाच्या वाफ्याला आठ दिवस पाणी घालू नये व खताचे छोटे छोटे ढीग तयार करून ठेवावेत म्हणजे गांडुळे तळाशी जातील. गांडूळ खत वेगळे करावे व न कुजलेले भाग गांडुळांना परत खायला घालावेत. गांडूळ खत वेगळे करताना शक्‍यतो कुदळ, टिकाव व फावडे यांचा वापर करू नये. त्यामुळे गांडुळांना इजा पोचणार नाही.

झाडांची पाने, कापलेले गवत, तण,  काडीकचरा, पालापाचोळा, भाज्यांचे टाकावू भाग, प्राण्यांची विष्ठा (कोंबड्यांची विष्ठा वगळता) कंपोस्टखत, शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडुळाचे आवडीचे आहेत.

शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळ खत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा खत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रिय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरून गांडूळ खत तयार करता  येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

Agricultural Products GI Tag: ‘नाबार्ड’मुळे १७६ उत्पादनांवर ‘जीआय’ मानांकनाची मोहोर

SCROLL FOR NEXT