Yavtmal Farmer Protest : जिल्ह्यातील कापूस उत्पादक (Cotton Producer), हरभरा (Chana) तसेच तूर उत्पादक (Tur Producer) शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. याच मुद्दावर जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने (Shetkari Sangharsh Samitee) आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास २७ फेब्रुवारीपासून समिती ‘संघर्ष’ करण्याची तयारी असून, जिल्हाभरात आंदोलन उभारणार आहे.
२८ डिसेंबर २०२२ ला केंद्र सरकारने तीन लक्ष कापूस गाठी आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कापसाचे बाजार भाव तीन हजार रुपयांनी खाली आले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तापदायक ठरला. कापसाला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली असताना केंद्र सरकारने कापूस आयातीचा निर्णय घेतला.
परिणामी, कापसाचे भाव कोसळले. हा निर्णय तत्काळ रद्द करावा, या वर्षी जिल्ह्यामध्ये हरभरा पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हरभरा बाजारात विक्रीसाठी येण्यास सुरुवातही झाली. परंतु सरकारी हमीभावापेक्षा बाजारातील दर कमी आहे.
शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते आहे. सरकारने हमीभावानुसार चणा खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावी, चणा खरेदीची मर्यादा हेक्टरी २५ क्विंटल करावी, आदी मागण्या शेतकरी संघर्ष समितीच्या आहे.
याशिवाय ८० टक्के शेतकऱ्यांच्या तुरी ऐन काढणीच्या वेळी जळाल्या. तूर उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये मदत शासनामार्फत विनाविलंब केली जावी, अशी मागणी संघर्ष समितीची आहे.
या मागणीसाठी २७ फेब्रुवारीपासून शेतकरी संघर्ष समिती आंदोलनाच्या तयारीत आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, अशोक बोबडे, प्रा. घनश्याम दरणे, राम देवसरकर, अनिल हमदापुरे, मनोज जयस्वाल, नाना गाडबैले, सुरेश चिंचोळकर, अनिल गायकवाड, संजय परडखे, चंद्रशेखर चौधरी, विनोद खडसे, जावेद अन्सारी, प्रा. बबलू देशमुख, आनंद जगताप, शशिकांत देशमुख, चंदू चांदोरे, सुकांत वंजारी, देवा शिवरामवार, प्रा. सुभाष गावंडे, प्रा. चरण पवार, नासिर शेख, पल्लवी रामटेके, वैशाली सवाई, स्वाती येंडे, राजीव निलावार, मोहन भोयर, आशिष सोळंके, बाळू पाटील दरणे, वसंतराव घुईखेडकर, युवराज अर्मळ आदी मंडळी उपस्थित होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.