Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : पावसाळापूर्व खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली

Agriculture Work : यंदा प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक बाबींची तयारी शेतकऱ्यांसह नागरिक करत असतात. त्यात धान्य भरून ठेवणे, लाकूड फाटा गोळा करणे, सुकी मासळी साठवणूक करणे आदी कामांसाठी प्लॅस्टिक, ताडपत्रींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असतो. यंदा प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पावसापासून पिकांचा बचाव व्हावा. घरांना गळती लागून नुकसान होऊ नये. त्याचप्रमाणे शहरातही छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी मागून ठेवलेला विविध प्रकारचा साहित्याचा साठा, तयार करून ठेवलेले उत्पादन पावसात भिजू नये, याची खबरदारी घेण्यासाठी प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्रींची खरेदी केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर सध्या नागरिकांसह शेतकरी, उद्योजकांकडून दुकानांवर खरेदीसाठी गर्दी होत आहे.

त्यामुळे मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने दरातही काहीशी वाढ झालेली आहे. शेतकरी, नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी प्लॅस्टिक, कापड आणि ताडपत्री घेण्यासाठी गांधी चौक, एसटी स्टँड परिसरातील दुकानांवर गर्दी केली आहे. ग्रामीण भागातून अधिक मागणी आहे. शेतकऱ्यांचा त्यात अधिक समावेश आहे.

आतापासूनच खरेदी-विक्री सुरू झाल्याने विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आले. प्लॅस्टिक कापडी विक्रीच्या सर्वच दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत. खासकरून रोल प्लॅस्टिकची सर्वाधिक विक्री होत आहे.

त्यापाठोपाठ ताडपत्रींची विक्री होत आहे. वाहनधारकांकडूनही प्लॅस्टिक आणि ताडपत्रीचे वाहन कव्हरची मागणी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे वाढलेल्या मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. यातच कच्च्या मालाचे दर वाढले आहे.

जव्हारमध्ये वळवाचा पाऊस झाल्यापासून प्लॅस्टिकला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरांमध्ये सुमारे ३५ टक्के वाढ झाली आहे. यंदा सर्वच प्रकारच्या ताडपत्रींची मागणी वाढत आहे. सध्या आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकांचा कल हा टिकाऊ वस्तूवर अधिक आहे.
- एजाज कोतवाल, विक्रेता, जव्हार
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जव्हार तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. जीवितहानी, वित्तहानी झाल्या. घरे, शाळा, आरोग्य, इमारतींवरील छप्पर उडाले आहेत. या घटनांची आवराआवर म्हणून प्लॅस्टिक कागद आणि ताडपत्री खरेदीसाठी जव्हार शहरात गर्दी होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आला आहे.
- माधुरी पाटील, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Wildlife: राज्यात दोन नवीन अभयारण्ये; १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मान्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय

Cotton Rate: पुढील २ महिने कापसाचे भाव टिकणार? अमेरिकेच्या निर्यातीचा बाजाराला आधार

Jal Jeevan Mission : पाणी योजनेच्या रखडलेल्या कामांवरून सीईओंचा संताप

Agricultural Loans: पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब पीककर्ज द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Drought Management : टंचाईवर मात करण्यासाठी 'पाणी, धान्य आणि चारा' नियोजनाची गरज

SCROLL FOR NEXT