Risod APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Risod APMC : निवडणुकीसाठी रिसोड बाजार समिती घेतली ताब्यात

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यात आली आहे. यामुळे आता सलग १२ दिवस बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत.

 गोपाल हागे

Washim News : विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यात आली आहे. यामुळे आता सलग १२ दिवस बाजारातील व्यवहार बंद राहणार आहेत. ऐन सोयाबीन विक्रीच्या हंगामात हा प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. गेल्या आठवड्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाजार समिती बंद होती. दोन-चार दिवस व्यवहार होत नाही, तोच पुन्हा आता बाजार बंद ठेवल्या जात असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.

दिवाळीनिमित्त येथील बाजार समिती आठ दिवस बंद होती. चार नोव्हेंबरपासून बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत झाले. दिवाळीच्या काळात बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना किरकोळ व्यापाऱ्यांना आपला माल विकावा लागला. यामध्ये त्यांचे क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांचे नुकसानही झाले.

बाजार समितीतील व्यवहार पूर्ववत होत असताना पुन्हा निवडणुकीचे साहित्यवाटप करण्याच्या नावाखाली बाजार समिती सोमवार (ता. ९)पासून गुरुवार (ता. २१)पर्यंत बंद राहणार आहे. तसे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले आहे. सदर पत्रामध्ये ११ नोव्हेंबरपासून बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले आहे. तर शनिवार (ता. ९) व रविवारी (ता.१०) बाजारातील ओट्यांवरील माल हटविण्यात येणार आहे.

आता बाजार सलग बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. सध्या रब्बी पेरणीची लगबग सुरू आहे. रब्बी पेरणीच्या खर्चासाठी शेतकरी पैशाची तजवीज करण्याच्या उद्देशाने सोयाबीनची मिळेल त्या भावात विक्री करीत आहेत. परंतु पुन्हा बाजार समिती बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

या मुद्यावर बाजार समितीने राज्य, जिल्हा, तालुक्याच्या निवडणूक विभागाला, पणन अधिकाऱ्यांना पत्र देत शेतकऱ्यांचा बाजार बंद ठेवला जाऊ नये म्हणून पर्याय काढण्याची विनंती केली होती. पण कुणीही मागणीला दाद दिली नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्यावेळीही १८ दिवस बाजार समिती ताब्यात घेण्यात आली होती. आताही इतरत्र जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत बाजार समितीची जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याचे दिसूनही नाइलाज झालेला आहे. शेतकरी हुकूमशाही कारभाराचा अनुभव घेत आहेत.
विष्णूपंत भुतेकर, सभापती, बाजार समिती, रिसोड, जि. वाशीम

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT