Vidhansabha Election : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन महिलांना आमदारकीची संधी

Ahilyanagar Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आहिल्यानगर जिल्ह्यात केवळ मोनिका राजळे आणि स्नेहलता कोल्हेया दोन महिलांनाच आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आहे.
Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर ः विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आहिल्यानगर जिल्ह्यात केवळ मोनिका राजळे आणि स्नेहलता कोल्हेया दोन महिलांनाच आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली आहे.

१९५१ पासून ते २०१९ पर्यंत झालेल्या पंधरा वेळेच्या विधानसभा निवडणुकीत तीस महिलांनी वेगवेगळ्या मतदारसंघात नशिब अजमावले, पण केवळ दोघींनाच यश आले. अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात ९ त्यानंतर १३, १२ असे विधानसभा मतदार संघ त्या कळातील रचनेनुसार होते. आतापर्यंत झालेल्या पंधरा निवडणुकीत महिलांना मात्र फार प्राधान्य दिल्याचे दिसून आले नाही. विधानसभेच्या अस्तित्वानंतर ७४ वर्षांत केवळ तीस महिलांनी विधानसभेला नशिब अजमावले.

अहिल्यानगर जिल्ह्यात बहुतांश काळ काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. मात्र दोन-चार वेळेसचे अपवाद वगळता महिलांना उमेदवारीचीही संधी दिली नाही. निवडणुकीत सुरुवातीला १९५१ साली हिराबाई भापकर या कामगार किसान पक्षाकडून लढल्या. १९६२ ला त्यांनी पुन्हा कर्जतमधून अपक्ष निवडणूक लढवली. कमला रानडे १९५७ ला अहिल्यानगरच्या दक्षिणेतून अपक्ष व १९७२ ला काँग्रेसकडून निवडणूक लढवली.

Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभेच्या लढती निश्चित

१९७२ ला माणिकबाई गर्जेयांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली, १९९० ला कर्जतमधून रंजना पाटील यांनी जनता दलाकडून निवडणूक लढवली होती. १९९० ला श्रीरामपूरमधून विमल वाणी निवडणूक लढवली, १९९५ ला कर्जतमधून रंजना पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. १९९५ ला उत्तरेतून विजया कुटे यांनी काँग्रेसकडून, विमल गोफणे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. दक्षिणेतून छबुताई पालवे, जोत्स्ना त्रिभुवन यांनी अपक्ष, अलका परदेशी यांनी समाजवादी पक्षांकडून निवडणूक लढवली.

१९९५ ला शेवगावात झुंबरबाई थोरात यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्याचवर्षी राजश्री विखे यांनी शिर्डीतून भारीपकडून निवडणूक लढवली. १९९५ ला कोपरगावातून जाईबाई शेजवळ अपक्ष उमेदवार होत्या. अहिल्यानगर दक्षिणेतून शेख हबाबी अमर अपक्ष होत्या. १९९९ ला सुमनबाई पठारे अपक्ष लढल्या. १९९९ ला भाकपकडून सुमनबाई शिंदे उमेदवार होत्या. त्याचवर्षी अंजनाबाई बंदे पारनेरमधून अपक्ष, तर पारनेरमधून अखिल भारतीय सेनेकडून लता जाधव उमेदवार होत्या.

कोपरगावात २००४ ला प्रभावती पवार अपक्ष होत्या. त्याच वर्षी पारनेरमधून भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्षाकडून शकुंतला खैरे उमदेवार होत्या. २००९ ला संगमनेरमधून निशाताई शिवूरकर समाजवादी जन परिषदेकडून तर सुमन पांडे अपक्ष उमदेवार होत्या. त्याच वर्षी शेवगावातून हर्षदा काकडे अपक्ष होत्या, तर पारनेरमधून सुजाता ठुबे शिवराज्य पार्टीकडून उमेदवार होत्या. २०१९ ला शीतल कोल्हे कोपरगावातून एचजेपीकडून उमेदवार होत्या.

राजळे, कोल्हे एकाचवेळी आमदार

अहिल्यानगर जिल्ह्यातून २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीतून भाजपमध्येजात त्यावेळीच्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष मोनिका राजळे शेवगाव-पाथर्डीतून तर कोपरगावातून स्नेहलता कोल्हेयांनी निवडणूक लढवून जिंकून आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.

त्याच वर्षी श्रीरामपूरमधून राष्ट्रवादीकडून सुनीता मिलिंद गायकवाड, श्रीगोंद्यातून रत्नमाला ठुबे, नौशाद शेख या अपक्ष उमेदवार होत्या. २०१९ ला कोल्हेयांचा पराभव झाला, तर राजळे पुन्हा निवडून आल्या. या वर्षी हर्षदा काकडे व मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी), अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते, रत्नमाला ठुबे, (श्रीगोंदा), राणी लंके (पारनेर) मंगल भुजबळ (अहिल्यानगर) प्रभावती घोगरे, रेश्मा शेख (शिर्डी) या महिला निवडणूक रिंगणात आहेत. यंदा आतापर्यंतचा विचार करता सर्वाधिक महिला निवडणूक लढवत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com