Banks Open On 31st March Agrowon
ॲग्रो विशेष

Banks Open On 31st March : ३१ मार्चलाही सुरू राहणार बँका, आरबीआयचे आदेश

Reserve Bank of India : यंदाचे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२४ रोजी संपत आहे. यामुळे अनेकांचे लक्ष बँक व्यवहार पुर्ण करण्यासह आयकर भरण्याकडे लागले आहेत. यातच ३१ मार्च हा रविवार येत असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सर्व बँकांना नवे आदेश दिले आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ हे ३१ मार्च २०२४ रोजी संपणार आहे. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्णय घेताना, देशातील सर्व बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती आरबीआयने आपल्या X या समाजमाध्यमासह प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. यामुळे आता देशातील सर्व बँका रविवारी देखील खुल्या राहतील. तर केंद्र सरकारने २९, ३० आणि ३१ तारखांना सलग सुट्ट्या असल्याने सरकारी आर्थिक कामे आणि पेमेंटशी संबंधित कामांमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली होती. तर बँकांच्या सर्व शाखा खुल्या ठेवाव्यात, अशी विनंती रिझर्व्ह बँकेला केली होती.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने याबाबत बुधवारी (ता.२०) सांगितले की, सरकारी व्यवहारांशी संबंधित सर्व बँका ३१ मार्च २०१४ रोजी खुल्या राहतील. ३१ मार्च हा दिवस रविवार असून तो आर्थिक वर्षातील शेवटचा दिवस आहे. यामुळे आर्थिक वर्षातील सरकारी पावत्या आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांच्या पूर्ततेसाठी हा आदेश दिला असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

३१ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत व्यवहार

आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस हा ३१ मार्च असतो. यामुळे या दिवशी सरकारशी संबंधित सर्व व्यवहार पार पाडण्यासाठी नागरिकांची ताराबंळ उडालेली असते. तर काही सरकारी कामे देखील उरकण्याची घाईगडबड सुरू असते. यादिवशी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) करण्यावर भर दिला जातो. यामुळे ३१ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत व्यवहार या सुविधा सुरू राहणार आहेत.

कोण कोणत्या बँका राहतील सुरू?

३१ मार्च म्हणजेच रविवारी बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर ३३ एजन्सी बँका या खुल्या राहणार आहेत. तर या संबंधित बँकांनी देखील याबाबत माहिती बँक कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी सूचना रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

आयकर विभागही सज्ज

रिझर्व्ह बँकेने सर्व एजन्सी बँकांना सरकारी व्यवसायाशी संबंधित बँका खुल्या राहतील असा आदेश दिल्याने सर्व बँका खुल्या राहणार आहेत. मात्र याआधीच प्राप्तिकर विभागाने शनिवार आणि रविवार आपली सर्व कार्यालये सुरू ठेवण्याची घोषणा केली होती. तर आता शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टीही रद्द केली आहे.

तसेच याबाबत, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून १८ मार्च रोजी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत, २९, ३० आणि ३१ मार्च या तारखांना आयकर विभागातील कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाँग वीकेंड मिळणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT