World Bank Flood Control : कोल्हापूरचा महापूर रोखण्यासाठी पूरनियंत्रण आराखड्यास जागतिक बँकेकडून मंजुरी

Kolhapur Rain Flood कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस होताच महापुराचे पाणी बहुतांश भागात येतं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
World Bank Flood Control
World Bank Flood Controlagrowon
Published on
Updated on

Kolhapur Flood Control : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही काळात आलेल्या महापुरामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले. दरम्यान महापुरावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. जलसंपदा विभागाच्या पूरनियंत्रण आराखड्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली. या प्रकल्पाचे लेखाशीर्ष बनविण्यासाठी सरकारकडून मंजुरीही देण्यात आली आहे.

या मंजुरीमुळे राज्य सरकारच्या वाट्याची रक्कम या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. या खात्यात निधीची तरतूद होताच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असून, या प्रकल्पास गती मिळणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बाधीत भागाची प्रत्यक्ष पाहणी होणार आहे.

कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस होताच महापुराचे पाणी बहुतांश भागात येतं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सर्व पार्श्वभूमीवर महापुराचे नियंत्रण करण्यासाठी ८०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोल्हापूर जलसंपदा विभागाच्या ८०० कोटींच्या आराखड्यास सर्व स्तरावर मान्यता मिळाल्याने हा प्रकल्प आता गतीने मार्गी लागणार आहे.

पंचगंगा, दूधगंगा, वारणा, भोगावती या प्रमुख नद्यांसह अन्य नद्यांना येणाऱ्या पुरामुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. कोल्हापूर, इचलकरंजीसह शिरोळ, हातकणंगले तालुक्याला महापुराचा विळखा पडतो. महापुरामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग कित्येक दिवस बंद ठेवावा लागतो.

World Bank Flood Control
Kolhapur Irrigation Federation : 'राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांविरोधात हुकुमशाही आहे का'?

यासाठी जागतिक बँकेसह केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या ८०० कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. डीपीआर बनविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी लेखाशीर्ष बनविण्यास मान्यता दिल्याने निविदा प्रक्रिया राबवून लवकरच प्रत्यक्ष सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात १९८९, २००५, २०१९ आणि २०२१ या वर्षांत महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्याची मोठी हाणी झाली होती.

पंचगंगेवर बलुन बंधारा या आराखड्याअंतर्गत पंचगंगा नदीवरील राजाराम आणि सुर्वे बंधाऱ्याची पुनर्बाधणी होणार असून, या ठिकाणी बलुनचे बंधारे बसविण्यात येणार आहेत. बलुन बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात बलुनमधील हवा सोडल्यानंतर पाणी प्रवाहित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com