Lok Sabha Elections 2024  Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Elections 2024 : 'आनंदाच्या शिधे'ला आचारसंहितेचा ब्रेक

Anandacha Shidha : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार म्हणून राज्यातील शिंदे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेतले. यातच आनंदाचा शिधा वाटपाचा देखील निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता आचारसंहिता लागू झाल्याने आनंदाचा शिधा वाटपालाच ब्रेक लागला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लोकांना गोडधोड देण्याची योजना राज्यातील शिंदे सरकारने आखली होती. तसेच ११ मार्चला याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता. मात्र आता आचारसंहिता लागू झाल्याने रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा मिळणार नाही. तर दोन महिने आनंदाचा शिधा वाटप न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शिंदे सरकारने राज्यातील दुर्बल घटक आणि सामान्य नागरिकांना सण, उत्सवाच्या काळात लागणारे अत्यावश्यक साहित्य नाममात्र दरात वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. याप्रमाणे राज्यातील सुमारे १ कोटी ६९ लाख शिधा पत्रिकाधारकांना आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळत आहे. तर गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा देण्यात येणार होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पुढील दोन महिने आनंदाचा शिधा वाटप बंद राहणार आहे.

आनंदाचा शिधा पॅकिट 

राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून सण, उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधा रेशन कार्डवर दिला जात असे. साखर, रवा, मैदा, तेल, चणाडाळ असणारे पॅकिट फक्त १०० रूपयात देण्यात येते. 

आनंदाचा शिधा ७ जूनपर्यंत वाटप नाही

लोकसभा निवडणूक अचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे होळी, गुढीपाडव्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिळणारा आनंदाचा शिधा मिळणार नाही. तर आनंदाचा शिधा ७ जूनपर्यंत वाटप न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Model Village: या गावाला शाब्बासकी हवीच!

Election Commission : ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Panchayati Raj : स्वातंत्र्यानंतर पंचायती राज व्यवस्थेचा विकास

Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार

Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का

SCROLL FOR NEXT