Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rain Update : धरणक्षेत्रांत पावसाचा जोर ओसरला

Team Agrowon

Pune News : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागांत दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी (ता.१६) पावसाचा जोर ओसरलेला दिसून आला. प्रामुख्याने धरणक्षेत्रांतही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. धरणांतील पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. मंगळवारी (ता.१६) सकाळी आठ वाजेपर्यंत ३.४७ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

मागील दोन दिवसांत धरणक्षेत्रांत आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांत जवळपास दहा ते बारा टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. रविवारी (ता.१४) ४.३२ टीएमसी, तर सोमवारी (ता.१५) ५.७९ टीएमसी एवढ्या पाण्याचा साठा दाखल झाला आहे.

जिल्ह्यातील धरणांत उपयुक्त ४१.७० टीएमसी म्हणजेच २१ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी पावसाचा जोर मंदावल्याने मंगळवारी धरणांतील पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथ्यांवर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील कुंडली या घाटमाथ्यावर अवघा १२ मिलिमीटर पाऊस पडला. तर मुळशी घाटमाथ्यावर आठ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच जिल्ह्यातील शिरोटा दोन, वळवण तीन, लोणावळा चार मिलिमीटर पाऊस पडला. तर ठोकरवाडी घाटमाथ्यावर पावसाने उघडीप दिली होती.

दरम्यान मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या सर्वच धरणक्षेत्रांत ढगाळ वातावरण होते. अधूनमधून तुरळक सरी बसल्याची नोंद झाली आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी, नीरा देवघर, नाझरे, वडिवळे, आंध्रा, चासकमान, पवना या धरणक्षेत्रांत पावसाचा तुरळक शिडकावा झाला असून कासारसाई, कळमोडी, भामा आसखेड, शेटफळ, भाटघर, वीर धरणक्षेत्रांत पावसाने उघडीप दिली होती.

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड धरणक्षेत्रांत हलक्या सरी बरसल्या. तर येडगाव, डिंभे धरणक्षेत्रांत ढगाळ वातावरण कायम होते. विसापूर, उजनी धरणक्षेत्रांत तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

एक जून ते १६ जुलैपर्यतं धरण क्षेत्रनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर ११६८, वरसगाव ७००, पानशेत ७०१, खडकवासला २७५, पवना ७४४, कासारसाई ३२९, कळमोडी ४०५, चासकमान ३११, भामा आसखेड २६४, आंध्रा ३४३, वडिवळे ९०६, नाझरे २६८, गुंजवणी ८१४, भाटघर ३०६, नीरा देवघर ५४०, वीर १७२, पिंपळगाव जोगे १८१, माणिकडोह १९६, येडगाव २५७, वडज १६६, डिंभे २९०, चिल्हेवाडी १९५, घोड २५४, विसापूर १२९, उजनी २४८, मुळशी १७१०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT