Farmer Movement Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Movement : ‘नांदूर मधमेश्वर’चा प्रश्न पेटला

Aadhar Shetkari Jaldut Committee : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आधार शेतकरी जलदूत समितीने नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिल्यानुसार शेकडो शेतकऱ्यांनी कूच केली.

Team Agrowon

Nashik News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आधार शेतकरी जलदूत समितीने नांदूर मधमेश्वर धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिल्यानुसार शेकडो शेतकऱ्यांनी कूच केली. त्या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. काहींनी तर थेट धरणात जाऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील पाणी प्रश्न पेटला आहे.

नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम या चार धरणांतून ११ टीएमसी पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर तालुक्यांतील १०२ गावांसाठी आरक्षित आहे. या वर्षी अत्यल्प पर्जन्यमनामुळे दुष्काळी परिस्थिती असल्याने आवर्तन सुटण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

१० मेपर्यंत पाण्याचे आवर्तन न सुटल्यास जलसमाधी आंदोलन करण्याबाबत बुधवारी (ता. ८) समितीचे अध्यक्ष पंडित शिंदे, सचिव सुरेश शिरसाट यांसह लाभधारक शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र आवर्तन न सुटल्याने संतप्त आंदोलकांनी थेट नांदूर मधमेश्वरचा रस्ता धरला.

शेकडो आंदोलक धरणाच्या दिशेने येत असतानाच येवला पोलिसांनी दुपारी १२ नंतर गवंडगाव टोल नाक्यावर अडवून त्यांना ताब्यात घेतले. दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणांतून निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणात नगर आणि निफाड तालुक्यांतील गावासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने या पाण्यातून आम्हाला उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

आंदोलकांच्या नांदूर मधमेश्वर धरण परिसरात येणाऱ्या आंदोलकांवर लक्ष ठेवण्यासाठी म्हाळसाकोरे, तास दिंडोरी परिसरात पोलिसांचा फौज फाटा तैनात होता. मात्र नजर चुकवून चार आंदोलक नांदूर मधमेश्वर धरणात उतरले. ‘आम्ही आमच्या हक्काचे पिण्याचे पाणी मागतो,’ अशी भूमिका ते मांडत होते. या वेळी जलसंपदा विभाग व पोलिसांनी त्यांना पाण्यात अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही आमच्या जवळ आल्यास आम्ही खोलीकडे जाऊ, असा इशारा दिल्यानंतर ते पाण्यातच थांबले. अखेर पाच वाजेदरम्यान आंदोलक काठाकडे आल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inflation Rate: महागाई दरघटीचा बळी शेतकरीच

Agriculture Inflation: भूलभुलय्या महागाई दराचा!

POCRA Scheme Scam: ‘पोकरा’तील घोटाळा २०० कोटींहून अधिक

Pune Cluster School : पुणे जिल्ह्यातील वाडा येथे दुसरी समूह शाळा

Crop Loan Distribution: साडेतीन लाख कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT