APMC Market : लासलगाव बाजार समितीत भुसार, तेलबिया लिलाव पूर्ववत

Agriculture Auction : नाशिक जिल्ह्यासह लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंद असलेले भुसार व तेलबिया लिलाव बुधवारपासून (ता. ८) पूर्ववत झाल्याची माहिती लासलगाव समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.
Lasalgaon APMC Market
Lasalgaon APMC MarketAgrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतीमाल विक्रिसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना हिशेब पावतीतून हमाली, तोलाई व वाराईच्या रकमा कपातीबाबत नाशिक जिल्ह्यासह लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंद असलेले भुसार व तेलबिया लिलाव बुधवारपासून (ता. ८) पूर्ववत झाल्याची माहिती लासलगाव समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

Lasalgaon APMC Market
APMC Market : व्यापाऱ्यांचा माल ओट्यांवर, तर शेतकऱ्यांचा रस्त्यावर

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनमार्फत १ एप्रिलपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या हिशेब पावतीतून हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात न करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा, भुसार व तेलबिया या शेतीमालांचे लिलाव गेल्या महिनाभरापासून बंद होते.

लिलाव बंदच्या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या व्यापकहिताच्या दृष्टीने बंद लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू करण्याबाबत संबंधित घटकांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. परंतु सर्वमान्य तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दैनंदिन कांदा, भुसार व तेलबिया शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद होते. त्यामुळे लासलगाव बाजार समितीने व्यापारी वर्गाशी चर्चा करून बुधवारपासून (ता. ८) भुसार व तेलबिया शेतीमाल लिलाव पूर्ववत सुरू केले आहेत.

Lasalgaon APMC Market
Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

व्यापारी वर्गाच्या हस्ते भुसार व तेलबिया विक्रीसाठी आलेल्या पहिल्या वाहनाचे पूजन करण्यात आले. मुहूर्तावर रमेश बढे (विटावे, ता. चांदवड) यांचा धने हा शेतीमाल मनोज ट्रेडिंग कंपनी यांनी ७,२०१ रूपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला. सायंकाळपर्यंत एकूण ६३ वाहनांची आवक झाली. याप्रसंगी शेतकरी बांधवांसह अडते, व्यापारी, माथाडी, मापारी कामगार व इतर घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतीमाल आवक व दर स्थिती

आवक (क्विंटल) किमान कमाल सरासरी (रुपये)

गहू १२१ २,३५२ २,९८१ २,७५८

सोयाबीन २१८ ३,७०१ ४,५३१ ४,५००

मका २६५ २,१७५ २,२६१ २,२३१

हरभरा लोकल ८५ ४,००० ६,०९९ ५,८५१

हरभरा काबुली ३० ४,००० ७,४०१ ६,२४०

ज्वारी २६ १,८९९ ३,६०१ २,८००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com