Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukt Shiwar Scheme : जलयुक्त शिवार अभियानाची कार्यवाही रखडत

Team Agrowon

Nandurbar News : जिल्ह्यातील ८५ गावांत जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने मागील मार्चमध्ये दिली होती. परंतु यासंबंधीचा कार्यक्रम, प्रक्रिया रखडत सुरू आहे.

गावांतील शेतकऱ्यांच्या जीवनात जलक्रांती होऊन शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देऊ, असे शासन म्हणते, पण शेतकऱ्यांना केव्हा दृश्यरूपात काम दिसेल, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

आराखडे, मंजुरी, जिल्हा परिषद व कृषी विभागातील पुढील कामकाज थंड स्थितीत आहे. यातच यासंबंधी नियुक्त केलेली मंडळी व्यवस्थित माहिती ग्रामपंचायती, संबंधितांना देत नसल्याने आणखी समस्या व संभ्रम तयार होत असल्याचा आरोप केला जात आहे.

पिकांच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे सतत टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो. जिल्ह्यातील सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्‍चित व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्‍चितता या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत राबविण्यात आली होती.

यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान १.० मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील ४२३ गावांत एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी तसेच सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्धरीत्या अंमलबजावणी करून जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत विविध मृदा व जलसंधारणाचे क्षेत्रीय उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे घेऊन सिंचनाची सुविधा निर्माण केल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावांमध्ये मृद्‍ व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल अशा ठिकाणी जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत जिल्ह्यातील ८५ गावांत हे अभियान राबविण्यात येणार आहे, असे प्रशासन म्हणते.

गावांची संख्या अशी...

नंदुरबार तालुक्यातील २० गावे, नवापूर ६, शहादा १४, तळोदा ९, अक्राणी १७, तर अक्कलकुवा १९ अशा प्रकारे ८५ गावांचा समावेश केला आहे. परंतु या गावंत प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होईल, असा मुद्दा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT