Parbhani News : परभणी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड झाली आहे. या गावांमध्ये माथा ते पायथा उपायोजनाअंतर्गंत १८ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रावरील १ हजार ३०३ जलसंधारणाच्या कामांचा ७२ कोटी २७ लाख ६७ हजार रुपये निधीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.
सध्याच्या राज्य सरकारने सुरु केलेल्या जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड झाली आहे.जिल्हास्तरीय समितीने विविध यंत्रणानिहाय कामांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे.
ढाळीचे बांध, सलग समतळ, खोल सलग समतळ चर, शेततळी, अनघड दगडी बांध, गॅबियन बंधारे, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण, सिंमेट बंधारा, तलाव दुरुस्ती, केटीवेअर दुरुस्ती, रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे ही काम होणार आहेत.
क्षेत्र उपचार व नाला उपचार अंतर्गत मंजूर असलेल्या योजनाअंतर्गंत ११ हजार १७१ हेक्टरवरील ३९९ कामांसाठी १७ कोटी ६१ लाख ५४ हजार रुपये निधीची तरतूद आहे. एकूण ८७० नवीन कामे ७ हजार ४४८ हेक्टरवर होणार आहेत. त्यासाठी ५४ कोटी ६६ लाख १२ हजार रुपये निधीची तरतूद आहे.
विविध यंत्रणानिहाय कामांमध्ये कृषी विभागअंतर्गंत १४ हजार १३३ हेक्टरवरील ६७८ कामांसाठी १६ कोटी ८४ लाख २० हजार रुपये तर जलसंधारण विभागाअंतर्गत ३ हजार ७९१ हेक्टरवरील ४२६ कामांसाठी ४२ कोटी ९३ लाख ८८ हजार रुपये, वन विभागाअंतर्गत ६६० हेक्टरवरील ११६ कामांसाठी ११ कोटी ३३ लाख रुपये निधीची तरतूद आहे.
जिल्हा परिषदेतर्गत लघु पाटबंधारे विभागामार्फत २८ कामांसाठी ७७ लाख ५० हजार रुपये, भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ५५ कामांसाठी ३९ लाख रुपये निधीची तरतूद आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० आराखड्यातील कामे,निधी (कोटी रुपये)
तालुका निवडलेली गावे कामांची संख्या क्षेत्र हेक्टर निधी
परभणी १० ९९ १०९ ६.१८
जिंतूर २६ ७११ ९६०३ ३४.४७
सेलू ८ २६ ०० २.३७
मानवत २ २८ २५० ०.६५
पाथरी ३ २ ०० ०.३८
सोनपेठ ६ १९ ०० ०.२७
गंगाखेड २० २६४ ६४८२ १६.२२
पालम १० १०६ १९४० ८.३३
पूर्णा ६ ४८ २०० ३.३६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.