Water Shortage
Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : जळगाव जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईची समस्या कमी

Team Agrowon

Jalgaon Water News : गेले तीन वर्षे झालेला चांगला पाऊस आणि मुबलक जलसाठे (Water Stock) यामुळे खानदेशातील अनेक टंचाईग्रस्त (Water Shortage) भागात पिण्याच्या पाण्याची समस्या तयार होणार नसल्याचे चित्र आहे. गिरणा धरणाचा (Girana Dam) चांगला लाभ झाला असून, दोनदा यातून पाणी सोडण्यात आले आहे.

टंचाईग्रस्त गावे, परिसर याची संख्या कमी झाल्याने टंचाई आराखड्यात निधीची कमी तरतूद करण्याची स्थिती तयार झाली आहे. शिवाय टँकर, प्रशासनावर पाणीपुरवठ्याचा ताण अशी समस्यादेखील राहणार नाही, असे चित्र आहे.

जळगाव जिल्ह्यात २०१९ ते २०२२ यादरम्यान खानदेशात जोरदार पाऊस झाला. यंदा १५० टक्के पाऊस जळगाव, धुळे जिल्ह्यात झाला आहे. अतिपावसात पिके हातची गेली. दोन्ही वर्षे ओला दुष्काळ होता.

खानदेशात अपवाद वगळता सर्वच प्रमुख प्रकल्प म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील गिरणा, हतनूर, वाघूर, अंजनी, बहुळा, सुकी, अभोरा, गूळ, धुळ्यातील अनेर, पांझरा, नंदुरबारमधील दरा, सुसरी आदी प्रकल्प १०० टक्के भरले.

जलसाठे मुबलक असल्याने नदीतही पाण्याचे आवर्तन सोडले जात आहे. गिरणा धरणातून दोनदा पाणी सोडले असून, यामुळे किमान ११० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात सातपुड्यात पाणीटंचाई काहीशी तयार होत आहे. पण त्या भागात फक्त नऊ गावे टंचाईग्रस्त होतील, अशी स्थिती आहे. धुळ्यात साक्री व शिरपुरात टंचाई असेल. परंतु ही टंचाई मेअखेरिस तयार होवू शकते. तीदेखील १३ गावांसाठी राहील.

नंदुरबारात सातपुडा पर्वतातील सुमारे नऊ पाडे व नंदुरबार, नवापूर भागातील १७ गावांमध्ये मे नंतर टंचाई तयार होईल, असा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे पाच कोटी व धुळे, नंदुरबारात सुमारे १२ कोटी रुपयांची तरतूद टंचाईसंबंधी लागेल, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT