Agriculture Produce Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Market : सभापतींची बैठकही निष्फळ; बाजारात शुकशुकाट

Market Update : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात खरेदीदार व अडत्यातील वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे सहाव्या दिवशीही अडत बाजारात शुकशुकाट राहिला.

Team Agrowon

Latur News : येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात खरेदीदार व अडत्यातील वाद मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे सहाव्या दिवशीही अडत बाजारात शुकशुकाट राहिला. बाजार समितीच्या सभापतींनी दोनही गटांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, दोनही गट आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने ही बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे शनिवारीदेखील शेतीमालाचा सौदा निघू शकला नाही. सध्या अडत बाजारात किमान पंधरा हजार क्विंटल शेतीमाल पडून आहे.

गेल्या काही वर्षांत काही खरेदीदारांनी कोट्यवधींची खरेदी करून दिवाळखोरी जाहीर केली. याचा मोठा फटका अडत्यांना बसला आहे. दिवाळखोरी काढलेल्या खरेदीदारांवर काहीच कारवाई होत नसल्याने अडत्यांमध्ये असंतोष आहे. शेतीमाल विकेल्यानंतर पेमेंट २४ तासांच्या आत मिळावे किंवा चार-पाच दिवसांचा पुढील धनादेश तरी खरेदीदारांनी द्यावा, अशी मागणी अडत्यांची आहे. यातून गेल्या सोमवारपासून अडत बाजार बंद आहे.

बैठकांवर बैठका, पण तोडगा निघेना

बाजार बंद झाल्यापासून बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. त्यात शनिवारी (ता. ६) पुन्हा बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी खरेदीदार व अडत्यांची बैठक घेतली. काही तरी तोडगा काढून बाजार सुरू करावा, शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पंधरा हजार क्विंटल शेतीमाल पडून

सहा दिवसांपासून अडत बाजार बंद आहे. सध्या खरिपाचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मात्र, असे असताना बाजार बंद आहे. सध्या या बाजारात किमान पंधरा हजार क्विंटल शेतीमाल अडतीवर पडून आहे. त्याचा सौदाच होत नाही. त्यामुळे शेतकरीही अडचणीत आले आहेत. सौदा कधी निघणार, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

पेमेंटच्या कारणावरून अडते व खरेदीदार यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात बैठका घेण्यात येत आहेत. शनिवारीदेखील दोनही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पण, दोनही संघटना आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही. बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जगदीश बावणे, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Jeevan Mission : वीज जोडणीअभावी रखडले जलजीवन मिशन योजनेचे काम

Sugarcane Damage : आडव्या उसासाठी हवी मदत

Rain Crop Damage : नाशिक विभागात ८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान

Farmer Relief : आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार मदत करा

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

SCROLL FOR NEXT