Silk Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Industry : रेशीम उद्योगाला ‘पोकरा’चे बळ

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : हवामानाच्या प्रतिकूलतेत शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या व महाराष्ट्राला पारंपरिक रेशीम कोष उत्पादक राज्याकडे घेऊन जाणाऱ्या रेशीम उद्योगाला राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प.

अर्थात ‘पोकरा’ने आर्थिक बळ देण्याचे काम केले आहे. या प्रकल्पामधून ४६२५ शेतकऱ्यांना त्यांच्या रेशीम उद्योगातील विविध घटकांसाठी अनुदान मागणीच्या १० हजार १४२ अर्जाप्रमाणे जवळपास ७२ कोटी ४५ लाख रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे.

महाराष्ट्रात रेशीम उद्योगाचा विस्तार झपाट्याने होतो आहे. बाजारपेठांची निर्मिती झाल्याने कोष खरेदी विक्रीचा प्रश्‍न मार्गी लागतो आहे. ‘महिको’सारख्या बीजोत्पादनातील आद्य कंपनीने अंडीपुंज निर्मिती सुरू केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या कोषातून आपल्या उत्पन्नात दुपटीपेक्षा जास्त वाढ करण्याची किमया अंडीपुंजासाठीच्या कोष उत्पादनातून काही शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे.

कर्नाटकातही जालन्यातून अंडीपुंज गेले व जात आहेत. शिवाय धागा निर्मितीपर्यंत रेशीम विभागाच्या माध्यमातून वाटचाल झाल्याने आता त्या धाग्याला पिळ देण्याची व डाइंगचीही तयारी राज्यात सुरू आहे. रेशीम उद्योगाच्या विस्तारापैकी निम्मा वाटा मराठवाड्याचा आहे. हवामानाच्या प्रतिकूलतेतही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तारण्याचे काम रेशीम उद्योगाने केले आहे.

नेमक हेच हेरून रेशीम उद्योगातील शेतकऱ्यांना असलेली संधी लक्षात घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील १६ जिल्ह्यांतील रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांना तुती लागवड, शेड उभारणी, यंत्रसामग्री तसेच रिलिंग युनिटसाठी एकूण ७२ कोटी ४५ लाखांचे अर्थसाह्य दिले गेले आहे. याशिवाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उद्योगाविषयी सजग करण्याचा प्रयत्नही केला गेला आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक अनुदान

बीड जिल्ह्यात रेशीम उद्योग राज्यात सर्वाधिक झपाट्याने विस्तारला आहे. मराठवाड्यातील एकूण ९८३५ एकर तुती लागवडीपैकी ४५८३ एकर तुती क्षेत्र बीड जिल्ह्यात असल्याचे आकडे सांगतात. आताही महारेशीम अभियानात बीड जिल्ह्याला तेथील शेतकऱ्यांचा या उद्योगाप्रती उत्साह पाहून जिल्हानिहाय पाहता सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या अर्थसाह्यापैकी सर्वाधिक ४६ कोटींचे अर्थसाह्य एकट्या बीड जिल्ह्यात देण्यात आले आहे. त्यामध्ये नेकनूर येथे रिलिंग युनिटसाठी दिल्या गेलेल्या अर्थसाह्याचाही समावेश आहे.

हवामानाच्या प्रतिकूलतेतही प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात रेशीम उद्योग शेतकऱ्यांना तारत असल्याचे चित्र आहे. रोजगार निर्मिती व स्थलांतर थांबविण्यात रेशीम उद्योग महत्त्वपूर्ण ठरल्याचे काही उदाहरणावरून पुढे आले आहे. ‘पोकरा’च्या माध्यमातून रेशीम उद्योगाच्या विविध घटकासाठी अर्थसाह्य दिले आहे.
विजय कोळेकर

मृदा विज्ञान तज्ज्ञ, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

जिल्हानिहाय लाभार्थी आणि अनुदान वितरण

जिल्हा लाभार्थी अर्ज अर्थसाह्य

अकोला १५ २४ १५ लाख

अमरावती १९ ३१ १९ लाख

बीड २२७९ ६३७३. ४६ कोटी ५३ लाख

बुलडाणा ३८ ७५ ४९ लाख

छ. संभाजीनगर ८९८ १४२२ १० कोटी ३० लाख

धाराशिव १९४ ४०८ २ कोटी ५० लाख

हिंगोली ११२ १५९ १ कोटी ३९ लाख

जळगाव १४९ २९४ १ कोटी ९९ लाख

जालना ५८६ ८४९ ५ कोटी ८७ लाख

लातूर १५९ २४९ १ कोटी ५२ लाख

नांदेड ६४ ८३ ४७ लाख

नाशिक (मालेगाव) १३ १३ ५ लाख

परभणी ४० ४८ २६ लाख

वर्धा ३८ ६७ ३९ लाख

वाशीम ५ ११ ९ लाख

यवतमाळ १६ ३६ २६ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT