Sericulture Subsidy : रेशीम शेतीसाठी अनुदानात ३९ हजारांची वाढ

Silk Rate Update : रेशीम संचालालयाकडून यंदा तुती लागवडीच्या मापदंडात ३९ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Sericulture farming
Sericulture farmingAgrowon
Published on
Updated on

Nanded News: रेशीम संचालालयाकडून यंदा तुती लागवडीच्या मापदंडात ३९ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.मागील वर्षी तीन वर्षांत तीन लाख ५८ हजार रुपये मिळत होते. पुढील वर्षापासून तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये मिळणार आहेत. यात पहिल्या वर्षी दोन लाख ८६ हजार १३५, दुसऱ्या वर्षी ५५ हजार सहाशे व तिसऱ्या वर्षी ५५ हजार ६०० रुपये मिळणार असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे यांनी दिली.

सद्यःस्थितीत पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेतकऱ्यांचा कल आता तीच पिके घेण्याकडे अधिक आहे. यादृष्टिने एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करून शेतीवर आधारीत जोडधंदा म्हणून रेशीम शेती ज्या शेतकऱ्‍यांकडे आठमाही पाणीपुरवठा असेल अशा शेतकऱ्यांनी प्रति एकर पाचशे रुपये व लागणारी कागदपत्रे संबंधित विभागाकडे जमा करावीत.

Sericulture farming
Sericulture Farming : रेशीम शेतीतून आर्थिक उन्नती साधावी

याचबरोबर आपली नाव नोंदणी करावी, असेही आवाहन रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांनी केले आहे. यापूर्वी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येत होती. याची व्यापकता अधिक वाढावी यादृष्टीने आता ही योजना शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद, कृषी विभागाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे

Sericulture farming
Sericulture Farming : रेशीम अभियान नव्हे; ही तर विचारांची पेरणी

या योजनेनुसार जिल्ह्यात मनरेगा निकषांतर्गत खुल्या प्रवर्गातील अल्पभूधारक असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत. याचबरोबर एस व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना इतर सवलती नियमाप्रमाणे देण्यात आल्या आहेत.

एक हजार एकर क्षेत्राचे लक्ष्य

या वर्षी रेशीम उत्पादनासाठी एकूण एक हजार एकर क्षेत्राचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पहिल्या वर्षी एकूण दोन लाख ८६ हजार १३५, दुसऱ्या वर्षी ५५ हजार ६००, तिसऱ्या वर्षी ५५ हजार ६०० असे एकूण तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदानाचे स्वरूप असेल. सिल्क समग्र-दोन योजनेतून एसी, एसटी प्रवर्गासाठी साडेचार लाख आणि इतर प्रवर्गासाठी तीन लाख ७५ हजार रुपये अनुदान मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com