Election in Co-operative  agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Co-operative Society Election : यावल शेतकरी संघाच्या निवडणुकीत अर्जांचा पाऊस

Team Agrowon

Jalgaon News : यावल शेतकरी सहकारी संस्थेच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, सहा मतदार संघ व १५ निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षरश: उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला असून. शेतकी संघाच्या निवडणुकीत एकूण १२१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. फुलपगारे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. सिंहले यांनी दिली आहे.

शेतकरी सहकारी संस्थेची व्यक्तिशः मतदार संख्या ७ हजार ३७७, तर संस्था १०८ अशी एकूण ७ हजार ४८५ मतदारांची संख्या आहे. या निवडणुकीत व्यक्तिशः मतदार संघात ४, संस्था मतदार संघात ६,

महिला राखीव मतदार संघात २, इतर मागासवर्गीय मतदार संघात १, अनुसूचित जाती जमाती मतदार संघात १, विमुक्त जाती भटक्या विमुक्त जाती व विमाप्र मतदार संघात १ अशा १५ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

मतदार संघनिहाय दाखल अर्ज

व्यक्तीच्या मतदार संघ-५२, संस्था सभासद-२९, महिला मतदार संघ-१६, इतर मागासवर्गीय मतदार संघ-१४, अनुसूचित जाती जमाती मतदार संघ-५, विजाभज व विजाप्र मतदार संघ ५ असे एकूण १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, अर्ज छाननी व माघारीच्या दिवशी किती अर्ज शिल्लक राहतात. तसेच प्रत्येक राजकीय गटाकडून उमेदवारांची मनधरणी कशी केली जाते, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT