Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : ‘नीरा भीमा’ला गतवैभव प्राप्त होणार

Team Agrowon

Bavda News :‘‘नीरा भीमा साखर कारखान्याने स्थापनेपासून अनंत अडचणींवर यशस्वीपणे मात करीत प्रगती साधली आहे. सध्या जरी आर्थिक अडचणी पूर्णपणे संपलेल्या नसल्या, तरी अनेक आर्थिक अडचणी मार्गी लागलेल्या आहेत. कारखान्यावरती सभासदांची असलेली निष्ठा आणि सहकार्यामुळे कारखान्याला गतवैभव निश्चितपणे प्राप्त होईल,’’ असा विश्‍वास कारखान्याचे संस्थापक आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा साखर कारखान्याची सन २०२३-२४ ची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवनमध्ये झाली. या सभेत सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन हर्षवर्धन पाटील यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार होते.

या सभेत मार्गदर्शन करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘गत हंगामात उसाचे गाळप कमी झाले,. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. कमी वयाच्या उसाचे गाळप झाल्याने साखर उतारा कमी आला. त्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी मिळाले. परिणामी, गत गळीत हंगामामध्ये कारखान्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. आगामी काळात कारखान्यास चांगल्या गुणवत्तेचा ऊस देऊन सहकार्य करावे.’’

लालासाहेब पवार यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी, संस्था चालविताना सध्या अनेक अडचणी येत आहेत, आम्हाला नाहक टीका सहन करावी लागत आहे. संस्था उभारून चालवणे हे सोपे काम राहिलेले नाही. मात्र, तुमचे सर्वांचे सहकार्य व प्रेम या पाठबळावर संस्थांच्या प्रगतीसाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

सभेच्या प्रारंभी श्रद्धांजली ठराव कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मांडला. तसेच यावेळी बावडा परिसरासाठी वरदान असलेला शेटफळ हवेली तलाव भरून घेतलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार केला. सभेचे अहवाल वाचन प्र. कार्यकारी संचालक सुधीर गंगे पाटील यांनी केले. उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी आभार मानले.

सभेस विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, दत्तात्रेय शिर्के, अनिल पाटील, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, विकास पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, प्रसाद पाटील, चंद्रकांत भोसले, राजकुमार जाधव, तानाजी नाईक, दत्तात्रेय पोळ, कमाल जमादार, मोहन गुळवे, विक्रम कोरटकर, अजय पाटील, आजिनाथ पाटील, सुरेश मेहेर, रघुनाथ राऊत उपस्थित होते.

‘जनतेच्या मनातला निर्णय होईल’

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या उमेदवारीबद्दल जनतेच्या मनात आहे, तोच निर्णय घेतला जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यावरती काही कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करताच हर्षवर्धन पाटील यांनी, ‘पितृपंधरवडा जाऊ द्या,’ अशी टिप्पणी केली. त्यावरती लगेच एका वयोवृद्ध कार्यकर्त्याने उभे राहत ‘भाऊ तुम्ही तुतारी घ्या,’ अशी मागणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

Wheat Sowing : खानदेशात गव्हाची २४ हजार हेक्टरवर पेरणी शक्य

ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

Agriculture Awards Ceremony : महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

Krishi Sahayyak : कृषी सहायकांच्या समस्यांवर पुण्यातील बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT