Strike of Revenue Employees Agrowon
ॲग्रो विशेष

Strike of Revenue Employees : महसूल कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे; आजपासून कामावर हजर होणार

Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil : महसूल खात्याच्या विविध मागण्यांसाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. तो अखेर स्थगित करण्यात आला असून बुधवारपासून कामावर रुजू होत आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महसूल खात्याच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून सुरू असणारा संप मागे घेतला आहे. मंगळवारी (ता.२३) मंत्रालयात पार पडलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलावलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, राज्य महसूल संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महसूल विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे यांनी संप थांबवण्याचे आवाहन केले होते. तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीद्वारे तोडगा काढावा अशा सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे महसूल विभागासाठी दांगट समितीचा अहवाल स्वीकारला जाईल. तसेच अन्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासन अपर मुख्य सचिवांनी महसूल कर्मचारी संघटनेला दिल्या नंतर संप मागे घेत असल्याची घोषणा महसूल कर्मचारी संघटनेनं केली. त्यामुळे बुधवार (ता.२४) पासून महसूल कर्मचारी आपल्या कामावर रूज होतील.

यावेळी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत महसूल विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि संघटनेच्या पदाधिकारी यांच्यात चर्चा झाली. या चर्चेनंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री विखे यांची भेट घेतली. यावेळी महसूल कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून इतर मागण्यांसाठी सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री विखे म्हणाले. तसेच लवकरच या मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासनही मंत्री विखे यांनी महसूल संघटनांना दिले. त्यानंतर ही निर्णय घेण्यात आल्याचे महसूल संघटनांनी जाहीर केले

महसूल विभागातील विविध मागण्यांसह प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. १५ जुलैपासून राज्यातील महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. तर ११ जुलैला कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम करत सरकारचा निषेध केला होता. तसेच १२ जुलैला लेखणीबंद ठेवून आंदोलन केले होते. त्यानंतर आता आठ दिवसानंतर मंत्री विखे यांच्या अश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

Girna Dam Water Storage : गिरणा धरणातील जलसाठा वाढतोय

Pandharpur Flood : पंढरपुरातील पुराचा धोका टळला

Agriculture Minister Dattatray Bharne: शेतकऱ्याचा मुलगा ते कृषिमंत्री; दत्तात्रय भरणे यांचा प्रवास

Agrowon Podcast: गव्हाचे दर टिकून; हळदीत चढउतार, केळीला श्रावणाचा उठाव, आले दरात सुधारणा, मका स्थिरावलेला

SCROLL FOR NEXT