Revenue Movement
Revenue Movement Agrowon

Revenue Movement : ‘महसूल’च्या आंदोलनामुळे ग्रामीण भागात कामे ठप्प

Works Stopped in Rural Areas : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सुरू केलेले कामबंद आंदोलन शुक्रवारी (ता. १९) पाचव्या दिवशी सुरुच होते.
Published on

Nagar News : महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सुरू केलेले कामबंद आंदोलन शुक्रवारी (ता. १९) पाचव्या दिवशी सुरुच होते. महसूल कर्मचारी कामावर येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात शुकशुकाट आहे. त्यामुळे महसुली कामे ठप्प आहेत.

महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सोमवार (ता. १५) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे विविध महसूल विभागाशी निगडित कामे ठप्प आहेत. शासन मागण्यांचा गांभिर्याने विचार करत नाही, त्यावर तोडगा काढत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील,

Revenue Movement
Animal Vaccination Campaign : कृषिकन्यांनी राबवली पशू लसीकरण मोहीम

असे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन आहेर, सरचिटणीस किशोर हटकर, नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र आंधळे, माजी अध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, उपाध्यक्ष अशोक मासाळ, संतोष झाडे, स्वप्निल फलटणे, अक्षय फलके यांनी सांगितले. या संदर्भात मंगळवारी (ता. २३) बैठक होईल.

Revenue Movement
Agrowon Sanvad : सोयाबीन, कापसामध्ये मृत सरी काढा : डॉ. गरुड

काही प्रमुख मागण्या अशा...

महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करा.

अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती द्या. पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांना महसूल विभागात सामावून घ्या.

वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर वाढविण्याबाबत निर्णय घ्या.

महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे १९०० वरून २४०० करा.

महसूल सहाय्यक, तलाठी यांना सेवांतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागू करा.

अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी करावे. नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड वेतन ४८०० करावा.

चतुर्थ श्रेणी शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना तलाठी संवर्गात २५ टक्के पदोन्नती द्यावी. कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी दर्जा द्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com