Shri Guru Paduka Darshan Agrowon
ॲग्रो विशेष

Shri Guru Paduka Darshan: भाविकांच्या गर्दीने फुलणार भक्तीचा महाकुंभ

Spiritual Festival Mumbai: मुंबईत प्रथमच एकाच छताखाली २१ श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. ८ आणि ९ मार्चला वरळीच्या एनएससीआय डोम येथे हा भक्तिरसात न्हालेला सोहळा पार पडणार आहे.

Team Agrowon

Mumbai News: ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या नोंदणीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ८ आणि ९ मार्चला वरळीच्या एनएससीआय डोम येथे होणारा ‘भक्तीचा महाकुंभ’ भाविकांच्या गर्दीने फुलणार, हे निश्‍चित झाले आहे. या उत्सवात एकाच छताखाली २१ श्रीगुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची संधी पहिल्यांदाच मुंबईकरांना मिळणार असल्याने भाविकांची लगबग वाढली आहे.

या सोहळ्यात वारकरी टाळ-मृदंगांसह सहभागी होणार असून, रिंगणासह भक्तिसंगीताने हा महोत्सव सजवणार आहेत. विविध भजनी मंडळे, देवस्थाने, विविध संस्थांचे कार्यकर्ते समूहाने सहभागी होऊन या भक्तिसंगमाचा आनंदोत्सव साजरा करणार आहेत. मुंबईतील मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींसह उद्योगसंस्था, विविध कार्यालयांतील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसह तरुणाईही या भक्तिसोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.

या महोत्सवात शनिवारी (ता. ८) सकाळी १० वाजता ‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’चे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उत्सवानिमित्त रविवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजता आध्यात्मिक गुरू, लेखक, शिक्षणतज्ज्ञ तथा सत्संग फाउंडेशनचे प्रमुख पद्मभूषण श्री एम यांचे व्याख्यान होणार आहे.

उत्सवात पोहोचण्यासाठी महालक्ष्मी (पश्चिम रेल्वे), भायखळा (मध्य रेल्वे) ही नजीकची उपनगरीय रेल्वेस्थानके असून कार्यक्रमस्थळाशेजारी नेहरू तारांगण हे बेस्टचे नजीकचे बसस्थानक आहे. सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. प्रत्येकाला निर्विघ्नपणे श्री पादुकांचे दर्शन व्हावे म्हणून ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. त्यासाठी भाविकांना सोबतचे क्यूआर कोड स्कॅन करून आपला प्रवेश निश्‍चित करता येणार आहे.

महोत्सवात संत आणि गुरूंच्या पादुका

ज्ञानेश्‍वर महाराज

संत मुक्त्ताई

नामदेव महाराज

संत जनाबाई

नरहरी सोनार

सेना महाराज

सावता माळी

एकनाथ महाराज

तुकाराम महाराज

संत निळोबाराय

श्री महेश्‍वरनाथ बाबाजी

श्री स्वामी समर्थ

श्री साईबाबा

श्री गजानन महाराज

समर्थ रामदास स्वामी

टेंबे स्वामी महाराज

गोंदवलेकर महाराज

शंकर महाराज

गुळवणी महाराज

सद्‌गुरू गजानन महाराज

श्रीगुरू बालाजी तांबे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

Flower Farming : फुलशेतीत उत्साहाचा ‘फुलोरा’

Paddy Plantation : पालघर जिल्ह्यामध्ये भात लावणी अंतिम टप्प्यात

Wildlife Crop Damage : नेसरी भागात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

SCROLL FOR NEXT