Heat Wave Agrowon
ॲग्रो विशेष

Heat Wave : मध्यप्रदेश सरकारने नैसर्गिक आपत्तीत केला उष्णतेच्या लाटेचा समावेश; मृतांच्या कुटूंबियांना मिळणार नुकसान भरपाई

Natural disasters include heat waves : देशाच्या विविध भागात गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटांचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला होता. तर विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा फटका बसल्याने जीनितहानी झाली होती.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : देशभरात उसळणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे विविध ठिकाणी गेल्या वर्षी पाहायला मिळाला होता. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार यावर्षी १ मार्च ते १९ जून या कालावधीत ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. याचा सर्वाधिक फटका मध्यप्रदेशला बसला होता. यामुळे आता राज्य सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये उष्णतेच्या लाटेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उष्णतेच्या लाटेमुळे निधन झालेल्या मृतकांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई मिळणार आहे.

यंदा उन्हाळ्यात देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट उसळली होती. मध्यप्रदेशमधीलही अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची व्याप्ती पाहायला मिळाली. तसेच मार्च ते जून दरम्यान उष्णतेच्या लाटेमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता मध्यप्रदेशात सरकारने नैसर्गिक आपत्तीमध्ये उष्णतेच्या लाटेचा समावेश केला आहे. या निर्णयानंतर उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या आश्रितांना भरपाई दिली जाईल.

दरम्यान प्रत्येक वर्षी होणाऱ्या लोकांच्या मृत्यूमुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारला नैसर्गिक आपत्तीमध्ये उष्णतेच्या लाटेचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर सरकारने अधिसूचना जारी केली.

मध्य प्रदेश सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात, राज्य सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ च्या कलम ३.२ आणि भारत सरकार, गृह मंत्रालय (आपत्ती व्यवस्थापन) पत्र क्रमांक ३३-०३-२०२१-NDM-I प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाप्रमाणे उष्णतेची लाट आपत्ती म्हणून घोषित करण्यात येत आहे. नवा आदेश पुढील वर्षीच्या उन्हाळ्यापासून लागू होईल.

देशभरात ११४ जणांचा मृत्यू

यंदा देशभरात विविध राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना घाम फोडला होता. तर उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, यावर्षी १ मार्च ते १९ जून या कालावधीत सुमारे ११४ जणांचा मृत्यू झाला. तर उष्माघाताची ४० हजार प्रकरणांची नोंद झाली. १९ जून २०२४ पर्यंत उष्माघातामुळे सर्वाधिक ३७ मृत्यू उत्तर प्रदेशात झाले. यापाठोपाठ बिहारमध्ये १७, राजस्थान आणि ओडिशामध्ये (१३) जणांचा मृत्यू झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT