Heat Wave : वाढत्या उष्णतेचा पोल्ट्रीला फटका|अकोल्यात दुसऱ्या दिवशीही कापूस बियाण्यांसाठी रांगा|राज्यात काय घडलं?

अकोल्यात कापूस बियाण्यासाठी दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच कृषी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
Poultry Farm Heat Wave
Poultry Farm Heat Waveagrowon
Published on
Updated on

वाढत्या उष्णतेचा पोल्ट्रीला फटका

वाढत्या उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसतोय. उन्हाच्या झळा आणि पाणी टंचाईमुळं पक्ष्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. त्यामुळं दक्षिण आणि पूर्व भारतात पक्षाच्या किमतीत २५ टक्के वाढ झालीय. पोल्ट्री उत्पादनाला फटका बसलाय. तापमान वाढत असून प्रत्येक पक्ष्याला साफसफाई दररोज दीड लीटर पाण्याची गरज असते. सध्या पाणीटंचाईमुळं अडचणी निर्माण झाल्यात. त्यामुळे १० ते १५ टक्के पक्ष्यांचे मृत्यू होत असल्याचं पोल्ट्री व्यावसायिक सांगतात. राज्यातील बहुतांश शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात. सध्या मात्र वाढत्या उष्णतेमुळं फटका बसतोय. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमधील उत्पादनात घट आल्यानं किंमती वाढ झाल्याचं जाणकार सांगतात. 

अकोल्यात आजही कापूस बियाण्यांसाठी रांगा

अकोल्यात कापूस बियाण्यासाठी दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच कृषी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. कृषी केंद्र सकाळी ११ वाजता उघडली जातात परंतु शेतकऱ्यांनी मात्र सकाळी ६ वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या.

खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळं शेतकऱ्यांची लगबग सुरू झालीय. परंतु शेतकऱ्यांची पसंती असलेल्या एका वाणांची टंचाई असल्याचं बोललं जातंय. बियाणे मिळाले पाहिजे यासाठी शेतकरी ४० किलोमीटर अंतरावरून सकाळीच अकोल्यात हजर होतायत. बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्याला अव्वाच्या सव्वा किमतीत बियाणे विकले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असताना कृषी विभागानं मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप शेतकरी करतायत. राज्यात सोयाबीन कापूस बियाण्याचा काळाबाजार जोरात सुरू असल्याचं शेतकरी सांगतात. 

भाजपच्या उमेदवाराने मागितली माफी

भाजपचे पंजाबमधील फरीफकोटचे उमेदवार हंसराज हंस यांनी शुक्रवारी (ता.२४) आंदोलक शेतकऱ्यांची माफी मागितली. ते शुक्रवारी दौलतपुरमध्ये प्रचारसाठी गेले होते. येथे बोलताना ते भावुक झाले. ते म्हणाले, मी शेतकऱ्यांचा शत्रू नाही. मी हात जोडून शेतकऱ्यांना विनंती करतो की, माझ्यासोबत असं वागू नका, असंही हंस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पटियाला येथील सभेला जाताना संगरूर रोड जवळील पसियाना चौकात आंदोलक शेतकऱ्यांनी हंसराज हंस यांनी घेराव घातला होता. त्यावेळी गोंधळ निर्माण झाला होता.

Poultry Farm Heat Wave
Cotton Seed: दिवसभर रांगेत उभे राहूनही शेतकऱ्यांना कापूस बियाणे मिळेना

हमीभाव कायद्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा गैर राजकीय आणि किसान मजूर मोर्चानं १३ फेब्रुवारीपासून आंदोलन छेडलेलंय. पण केंद्र सरकार आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कानाडोळा करतंय. त्यामुळं आंदोलक शेतकरी भाजप नेत्यांना विरोध करतायत. हंस आणि अन्य भाजप नेत्यांनाही शेतकऱ्यांचा रोषाला समोरे जावं लागतंय. हंस यांनी शेवटी भावनिक होत शेतकऱ्यांची माफी मागितली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com