Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage List : नुकसानग्रस्तांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात लावावी

Farmer's Compensation : शासकीय मदत मिळण्याकामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी. पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतच्या फलकावर प्रसिद्ध करावी.

Team Agrowon

Nashik Agriculture News : शासकीय मदत मिळण्याकामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तातडीने कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात यावी. पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतच्या फलकावर प्रसिद्ध करावी. कुणा शेतकऱ्याच्या नावाचा यादीत समावेश नसल्यास तातडीने पंचनामा (Crop Damage Survey) करून त्याच्या नावाचा यादीत समावेश करावा.

पंचनाम्याच्या कामाविषयीची त्रिसूत्री कार्यपद्धतीच्या सूचना देत खासदार हेमंत गोडसे यांनी एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये, असे अधिकाऱ्यांना बजावले.

सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली शिवारात तसेच पंचक्रोशीत मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे कधी नव्हे इतके मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस उद्ध्वस्त झाले. तर कांदा पिकासह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी खासदार गोडसे यांनी केली.

पाहणी दरम्यान खासदार गोडसे यांनी प्रशासनाला वरील सूचना केल्या. या वेळी प्रशासनाकडून मंडळ अधिकारी गाडे, ग्रामसेवक भाऊसाहेब वाढगे, तलाठी श्रीमती गांगुर्डे आदी उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान गोडसे यांनी मनोहर वाजे, महेश वाजे, विजय हगवणे, सुकदेव वाजे, उत्तम वाघ आदी शेतकऱ्यांच्या झालेल्या पॉलीहाऊस, कांदा तसेच पालेभाज्या आणि फळबागांच्या नुकसानीची पाहणी केली. याप्रसंगी सरपंच पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: मराठवाड्यात पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

Khandesh Rainfall : पावसाची पाठच; ‘हतनूर’मधून विसर्ग घटला

Nashik DCC Bank : जिल्हा बँकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू

Floriculture Management: सणासुदीसाठी झेंडू, शेवंती, निशिगंध फुलांचे नियोजन कसे करावे? उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचा सल्ला

PM Kisan Yojana : दुहेरी नोंदणीमुळे पीएम किसानचा लाभ मिळेना

SCROLL FOR NEXT