Ragi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मळगाव परिसरातील नाचणीची पाने करपली

Ragi Crop : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव (ता. सावंतवाडी) ब्राह्मणआळी परिसरातील नाचणी पिकाची पात अचानक करपण्यास सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळगाव (ता. सावंतवाडी) ब्राह्मणआळी परिसरातील नाचणी पिकाची पात अचानक करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाचणी पीक सकंटात येण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आंबा, काजू पिकांना सध्या बसत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. परंतु रब्बी हंगामातील पिकांनादेखील बदलत्या वातावरणाचा फटका बसू लागला आहे.

जिल्ह्याच्या काही भागांत रब्बी हंगामात भाजीपाला, भातपीक, नाचणी आणि चवळी, वाल आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव-ब्राह्मणआळी परिसरात उन्हाळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागात नाचणीची मोठी लागवड केली जाते.

परंतु महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या नाचणी पिकाची पात पूर्णतः करपून गेली आहे. कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक जाणवत असल्याचे हा परिणाम मानला जात आहे. जिल्ह्यात रात्रीचे तापमान १४ अंश सेल्सिअसपर्यंत असते तर दिवसा ३६ ते ३७ अंशांपर्यंत वाढते.

वाढलेल्या तापमानामुळे पात करपत चालल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पातच जळाल्यामुळे पिकाला कणीस येण्याची शक्यता कमी असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. नाचणीसोबत चवळी, वाली, मुळा, लाल भाजी, मिरची, भुईमूग, उडीद, कुळीथ, मका आदी पिकांचे देखील नुकसान होऊ लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT