Pik Bima Yojana
Pik Bima Yojana agrowon
ॲग्रो विशेष

Pik Bima Yojana : पिक विमा योजनेची अंतीम तारीख ठरली, सामुहिक सेवा केंद्रांनी जादा रक्कम घेतल्यास होणार कारवाई

sandeep Shirguppe

Pradhan Mantri Pik Bima Yojana : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२४ मध्ये ही योजना राबविण्यात येत असून या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदत १५ जुलै २०२४ अशी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सामुहिक सेवा केंद्र धारकांकडून केवळ १ रुपया भरुन पिक विमा योजनेअंतर्गत सहभागाची नोंदणी करावी. तसेच त्यांनी जादा आकारणी केल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-२०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसुचित क्षेत्र आणि पिकासाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सी.एस.सी केंद्र धारकांनी अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास संबंधित विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच तक्रार नोंद करण्यासाठी टोल फ्री क्रमांक १४५९९/ १४४४७. व्हॉटस ॲप क्रमांक- ९०८२६९८१४२, फोन नं. ०११-४९७५४९२३ व ९०८२६९८१४२ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

सन २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळे शेतक-यांना केवळ १ रुपया भरुन प्रधानमंत्री फसल बीमा योजना पोर्टल वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र व सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) यांच्या मार्फत योजनेत सहभागाची नोंदणी करता येईल.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) केंद्राने विमा कंपनीकडून प्रति अर्ज रक्कम ४० रुपये देण्यात येतात. त्यामुळे काही सामुहिक सेवा केंद्र (सी एस सी) केंद्राने शेतकऱ्यांकडून १ रुपया व्यतिरिक्त कोणतीही जादा रक्कम घेतल्यास ते केंद्रधारकांवर कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत दिनांक १५ जुलै देण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता अधिसुचित महसूल मंडळातील भात, खरीप ज्वारी, नागली, भुईमुग व सोयाबीन पिकासाठी सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा व आपले क्षेत्र संरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले.

अधिक माहीतीसाठी कृषि विभागातील क्षेत्रिय स्तरावरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी सर्व सी.एस.सी केंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Maharashtra Rain Update : पावसाचा जोर; पंचगंगा पात्रा बाहेर, मुंबईत एनडीआरएफची पथके तैनात

Jalgaon ZP : जळगाव जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून प्रशासकराज

SCROLL FOR NEXT