Solapur News : सोलापूर जिल्ह्यात चारा-पाण्याची टंचाई तीव्र होत चालली आहे. त्यात ग्रामीण भागात वाढत्या उन्हाने ग्रामस्थांसह जनावरे, पिके होरपळून निघत आहेत. या उन्हामुळे आता रोजगार हमीच्या कामावरही परिणाम झाला असून, या कामांवरील मजूरसंख्या वरचेवर कमी होत आहे.
अवघ्या महिनाभरातच सुमारे दोन हजार मजुरांनी या कामांकडे पाठ फिरवली आहे. वाढते ऊन हे एक कारण त्यामागे आहेच, पण मिळणारे तुटपुंजे वेतनही त्यामागचे आणखी एक कारण असल्याचे सांगण्यात येते.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये या आधीच दुष्काळ जाहीर झाला आहे. जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाने सध्या उणे ४१ टक्क्यांची पातळी गाठली आहे. शेतीसाठी धरणातून पाणी सोडता येत नाही, अशी सद्य:स्थिती आहे. विहिरी आणि बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे.
अनेक भागांत विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. शेतकऱ्यांवर मजुरीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर रोजगार हमीच्या कामांची मागणी वाढते. पण सध्याचे चित्र पाहता, ग्रामीण भागातून सर्वाधिक एका महिन्यात माढा तालुक्यातील ‘रोहयो’च्या कामांवर दोन हजार ५८ तर दक्षिण सोलापूर तालुक्यात ९३ मजूर वाढले आहेत. बाकीच्या सर्वच तालुक्यांमध्ये ‘रोहयो’च्या कामांवरील मजूर कमी झाले आहेत.
चाळीसगाव तालुक्यात ‘रोहयो’ची १५४३ कामे सुरूगेल्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वरचेवर वाढत आहे. तापमान तब्बल ४२ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. सरासरी ४० अंशांच्या पुढेच तापमान आहे. त्याचा परिणाम यामागे सांगितला जातोच. पण या कामावरील मजुरांना प्रतिदिन अवघी २९७ रुपये इतकी मजुरी मिळते, महागाईच्या काळात ही मजुरी अगदीच तुटपुंजी आहे.
त्यामुळेही मजुरांनी या कामाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत, साधारण महिनाभरात दोन हजार मजूर कमी झाले आहेत, मार्च महिन्यात या कामांवर १० हजार ४६३ मजूर होते, आता या कामांवर ८ हजार ४९४ मजूर आहेत, असे सांगितले जाते.
तालुकानिहाय मजूर संख्येतील घट
जिल्ह्यातील अकरा तालुक्यात अक्कलकोटला -३३२, बार्शी १६९१, करमाळा -१०४, माढा- ४०४८, माळशिरस- ११, मंगळवेढा -१७१, मोहोळ - ३०५, पंढरपूर -१३६६, सांगोला - २३६, दक्षिण सोलापूर-२३०, असे मजूर कामावर आहेत. उत्तर सोलापुरात मात्र एकही मजूर नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.