Labor Wages : रोजगार हमीवरील मजुरांची ७.८८ कोटींची मजुरी थकली

Employment Guarantee Scheme : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील ११ हजार मजुरांची गत अडीच महिन्यांपासून ७.८८ कोटींची मजुरी थकली आहे.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme Agrowon

Nashik News : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांवर काम करणाऱ्या जिल्ह्यातील ११ हजार मजुरांची गत अडीच महिन्यांपासून ७.८८ कोटींची मजुरी थकली आहे. रोजगार हमीच्या कामांवर काम करणाऱ्या मजुरांच्या खात्यात आठवडाभरात रक्कम जमा केली जात असताना केंद्र सरकारने २ नोव्हेंबर २०२३ पासून मजुरांच्या खात्यात रक्कम जमा केलेली नाही. यामुळे मजुरांची अवस्था बिकट झाली आहे.

वर्षातील किमान १०० दिवस मजुरांना रोजगाराची हमी देणारा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा केंद्र सरकारने केला आहे. यात मजुरांची ऑनलाइन हजेरी घेऊन दर आठवड्याला त्यांच्या कामाची रक्कम जमा केली जाते. ही रक्कम केंद्र सरकार थेट मजुराच्या खात्यात जमा करते.

Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : सातारा जिल्ह्यात ५७५ कामांवर चार हजार मजूर कार्यरत

रोजगार हमी मजुरांचे पैसे कधीही थांबवले जात नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी मजुरांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. मात्र, नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या दोन महिन्यांचे रोजगार हमी मजुरांचे पैसे केंद्र सरकारने मजुरांच्या खात्यात वर्ग केलेले नाहीत. संकेतस्थळावर काही समस्या असेल, असे गृहित धरले होते. मात्र, आता निम्मा जानेवारी महिना संपला तरीही मजुरांच्या खात्यात रक्कम वर्ग होत नसल्याने मजुरांवर उधार-उसनवारीची वेळ आली आहे.

रोजगार हमीवर इतर रोजंदारीच्या कामांपेक्षा कमी रक्कम मिळते. मात्र, वर्षभर काम तसेच प्रत्येक आठवड्याला मिळणारी मजुरी यामुळे मजूर रोजगार हमीला प्राधान्य देतात. मात्र, आता दोन महिन्यांपासून रक्कम थकल्याने मजुरांचे हाल होत आहेत. रोजगार हमी योजनेतून शिवार रस्ते, पाणंद रस्ते, सिमेंट बंधारे, वैयक्तिक लाभाच्या योजना आदी कामे केली जातात.

Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेतील सिंचनविहिरींच्या मान्यता रखडली

या कामांमध्ये ६० ते ९० टक्क्यांपर्यंत कुशल व उर्वरित अकुशल कामे होतात. त्यातील कुशल कामाची रक्कम राज्य सरकारकडून दिली जाते. जिल्ह्यातील कुशलच्या कामांचे ७.८८ कोटी रुपये दोन महिन्यांपासून थकित आहेत. यामुळे योजनेतून केली जाणारी सर्वच कुशल, अकुशल कामे अडचणीत आली आहेत.

तालुकानिहाय थकित मजुरी (रुपयांत)

बागलाण (१ कोटी १ हजार), चांदवड (१५.५३ लाख), देवळा (१६.४८ लाख), दिंडोरी (६२.७१ लाख), इगतपुरी (३० लाख), कळवण (७७.६०लाख), मालेगाव (७८.५५ लाख), नांदगाव (१ कोटी तीन हजार), नाशिक (५.२२ लाख), निफाड (३३.०९ लाख), पेठ (४६.५४लाख), सिन्नर (४७.३१ लाख), सुरगाणा (७१.३० लाख), त्र्यंबकेश्वर (५२.९८ लाख), येवला (४५.७२ लाख).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com