Pune News : जून महिन्यात कर्नाटक सरकारने कर्नाटक सहकारी संघ दूध म्हणजेच नंदिनी दुधाच्या दरात वाढ केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात ५ रूपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबचे संकेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. तर मधला मार्ग म्हणून २ रूपयांनी वाढ केली जाऊ शकते.
रामनगर जिल्ह्यातील मागडी येथे विविध विकासकांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्याप्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नंदिनी दुधाच्या दरवाढीचे संकेत दिले. यावेळी सिद्धरामय्या यांनी दरवाढ करून थेट दूध उत्पादकांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे सांगितले. तसेच याबाबत लवकरच कॅबिनेटची बैठक बोलावली जाईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले होते. सरकारचा हा निर्णय झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दूध दर वाढीच्या विरोध करणाऱ्या निजद नेत्यावर टीका केली. निजद नेते स्वत:ला भूमिपूत्र म्हणतात. पण तुम्ही कधी शेतकऱ्यांसाठी काही केलं आहे का? काहीही न करता फक्त भूमिपूत्र म्हणवून घेतलं जात आहे. आम्ही दरवाढ दूध उत्पादकांसाठी करत आहोत. मात्र तुमचा विरोध सुरू असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे.
तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की कोणीही विचारत नाही. पण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुधाचे भाव वाढवले तर अनेक नाराज होतात, अशी टीका मंत्री के.एन.राजण्णा यांनी केली होती. त्यावरून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रतिटीका केली होती. जोशी म्हणाले, मला सरकारच्या हेतूबद्दल शंका आहे. जरी त्यांनी शेतकऱ्यांना अतिरिक्त रक्कम हस्तांतरित केली तरी ती दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही असा दावा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला होता.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या मध्यम मार्ग काढतील. तर लिटरमागे २-३ रुपयांची वाढ करण्यासाठी देऊ शकतात. दुधाची खरेदी किंमत सध्या ३१ रुपये प्रतिलिटर असून ४१ रुपयांनी विक्री केली जात आहे. त्यामुळे दरवाढ झाल्यास अधिकचे ५ रूपये अथवा २-३ रुपये थेट शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सहकार मंत्री केएन राजण्णा यांना संभाव्य वाढीचे संकेत दिले आहेत. तसचे कर्नाटक दूध महासंघाच्या (KMF) संचालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
शेतकऱ्यांनाच वाढीव पैसै मिळतील
दरवाढीच्या प्रस्तावाचे समर्थन सहकार मंत्री राजन्ना यांनी केले आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत येथे दुधाचे खरेदी आणि विक्री दोन्ही दर खूपच कमी आहेत. सध्या खरेदी किंमत ३१ रुपये प्रतिलिटर आणि विक्री दर ४१ रुपये आहे. पण इतर राज्यांमध्ये दुधाचे दर प्रतिलिटर ५८ ते ६० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळेच राज्याती दूध उत्पादक शेतकरी दरवाढीची मागणी करत आहेत. त्यामुळेच सरकराने दूध दरवाढीचा विचार सुरू केला आहे. जर ५ रुपयांची संपूर्ण वाढ मंजूर झाल्यास त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होईल. सरकार किंवा दूध संघांच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय तो शेतकऱ्यांना दिला जाईल, असेही सहकार मंत्री राजन्ना यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.