Forest Agrowon
ॲग्रो विशेष

Man-Made Forest : मानवनिर्मित जंगलाची जपानी वाट

Mini Forest : मियावाकी यांच्या आकर्षणातून लाभलेली आणि हिसनोरी यांच्यासारख्या मागच्या पिढ्यांनी जपलेली ‘मिनी फॉरेस्ट’ची जपानी वाट साकारात्मकतेची दिशा दाखवत आहे. तेथील वनीकरणाची ही चळवळ हवामानबदलाच्या समस्येवर निश्‍चित उपयुक्त ठरू शकते.

Team Agrowon

सुनील चोरे

Japanese Way of Mini Forest : मानवनिर्मित घनदाट जंगल बनवण्याच्या प्रक्रियेचे जनक प्रा. डॉ. अकिरा मियावाकी या ख्यातनाम वनस्पती शास्त्रज्ञांच्या जपान येथील जगप्रसिद्ध योकोहामा राष्ट्रीय विद्यापीठाला भेट देण्याचा योग नुकताच आला. दोन वर्षांपूर्वी वनस्पतिशास्त्र, वनीकरण आणि पर्यावरण यात वैश्विक ठसा उमटवत प्रदीर्घ सेवेनंतर, वयाच्या ९३व्या वर्षी प्रा.मियावाकी यांचे निधन झाले.

त्यांचे संशोधक विद्यार्थी, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ हिसानोरी यांच्याशी पुण्यातील ज्येष्ठ अभियांत्रिकी सल्लागार अशोक सराफ यांच्यामार्फत संपर्क झाला. हिसानोरी यांनी खूप आदरातिथ्य करत विद्यापीठातील मियावाकी यांनी १९७८ मध्ये लागवड केलेल्या जंगलातून चालत नेले. एका गोल्फ कोर्सचे घनदाट जंगलात झालेले परिवर्तन ‘याची देही याची डोळा’ पाहून आपण अचंबित होतो.

मायक्रो फॉरेस्टसाठीच्या जमिनीचा पोत, स्थानिक प्रजातींची निवड, किती प्रजाती एकत्र करू शकतो याचे निकष, झाडांमधील खूप कमी अंतर, पालापाचोळ्याचे खत म्हणून नियोजन आणि यातून निर्माण होणारी जैवविविधता याचे पुरावेच समोर होते.

गेल्या ४५ वर्षांतील या मानवनिर्मित जंगलाचा इवल्याश्या रोपांपासूनचा प्रवास समाधानी मनाने दाखवत होते. मियावाकी जिथे अध्यापन करत त्या विभागातील सुसज्ज प्रयोगशाळा, वर्ग, भित्तीपत्रके, विविध शोधनिबंध, जर्नल पाहताना फॉरेस्ट इंजिनिअरिंगचा एक अविष्कार मनात उलगडत गेला.

तशी जपानची पारंपरिक घरे, मंदिरे, जुने राजवाडे सुबक कोरीव काम असलेल्या लाकडांचीच, त्यात दुसऱ्या महायुद्धानंतर लाकडाच्या गरजेसाठी मोठी जंगलतोड झाली. परंतु या कालावधीत एक साचेबद्ध वनीकरणाच्या धोरणानुसार जपान आता वनांनी प्रचंड वेगाने हिरवागार होत आहे.

ट्री स्टॅन्ड संकल्पनेनुसार मोकळ्या जागेत उद्योग, शाळा यांच्या आवारात लोकांचा समूह झाडांचे संगोपन करतो. संपूर्ण पर्वतच्या पर्वत या वनीकरण मोहिमेतून हिरवी चादर पांघरत आहेत. आपल्याला आपल्याकडे एसटी बसमधून बोडके केलेले डोंगर पाहायची सवय असल्याने इथले हिरवे डोंगर स्वर्गवत वाटत होते.

अचंबित करणारे जंगल

मियावाकी पद्धतीतून समोर आले की, अशा प्रकारे लागवड केलेल्या जंगलांची वाढ नैसर्गिक वाढीच्या तब्बल दहापट वेगाने, तर तीसपट घनदाट असते. भरघोस ऑक्सिजन निर्मितीशिवाय मौल्यवान अशा कार्बन फूटप्रिंटसाठी तर हे वरदान आहे.

शिवाय रोपे एकमेकांच्या जवळ लावली असल्याने सूर्यप्रकाश जमिनीवर शक्यतो पोचतच नाही. परिणामी मातीचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते, प्रकाशाच्या स्पर्धेमुळे झाडे आडवी नाही तर उभी उंच आणि जलदगतीने वाढतात.

जंगलतोड, जमिनीचा ऱ्हास, आर्द्रतेचा ताण आणि वैश्विक तापमानवाढ या आव्हानांवर हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. जगात सर्वाधिक कार्बन (हरित वायू) उत्सर्जनामध्ये जपान आणि भारत आता चीन, अमेरिकेखालोखाल आहेतच.

निरोपाच्या वेळी हिसानोरी यांना आम्ही करत असलेल्या आशीर्वाद वृक्ष उपक्रमाची माहिती दिली. साकारलेली मिनी फॉरेस्ट संकल्पना त्यांना छायाचित्रे आणि व्हिडीओमधून दाखवली. एका गुंठ्यांतील ५०-६० प्रजातींची विविधता आणि त्यांची एक वर्षातील झालेली वाढ पाहून हिसनोरीदेखील हर्षित झाले. औषधी वनस्पती म्हणून आपल्या कडुनिंबाविषयी त्यांना विशेष आकर्षण असल्याचे सांगितले.

शालेय नर्सरीच्या प्रवेशापासून इथे शाळेच्या प्रत्येक दिवशी दहा मिनिटे स्वच्छता, वृक्ष संगोपन असे सामाजिक भान निर्माण करणारे अनेक उपक्रम मुला-मुलींकडून करवून घेतले जातात. परिमाणी, एक सुदृढ समाज हा वारसा टिकवण्यासाठी सज्ज होतो आहे. मियावाकी यांच्या आकर्षणातून लाभलेली आणि हिसनोरी यांच्यासारख्या मागच्या पिढ्यांनी जपलेली ‘मिनी फॉरेस्ट’ची ही जपानी वाट साकारात्मकतेची दिशा दाखवून गेली.

(लेखक पुण्याच्या आशीर्वाद ग्रोथ फौंडेशनचे कार्यकर्ते आणि फॉरेस्ट इंजिनिअरिंगचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT