Nardana  Agrowon
ॲग्रो विशेष

Industrial Center : नरडाणा औद्योगिक केंद्राचा प्रश्‍न रेंगाळलेलाच

Team Agrowon

Dhule News : शिंदखेडा क्षेत्रातील बाभळे शिवारात केंद्र पुरस्कृत नरडाणा ग्रोथ सेंटर विकासाकडे झेपावत आहे. परंतु सेंटरमध्ये अनेक वर्षांपासून विनाप्रकल्प अडकवून ठेवलेल्या जमिनींमुळे गरजू उद्योजकांना प्लॉट मिळत नसल्याने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही.

सेंटरच्या विस्तारीकरणाचा प्रश्‍न भिजत ठेवल्याने हजारांवर शेतकरी नाहक वेठीला धरले गेले आहेत. ते ठाऊक असूनही सत्ताधारी कुणी हा प्रश्न‍ सोडविण्यासाठी ताकद पणाला का लावत नाहीत, हे न सुटणारे कोडे ठरले आहे.

अविकसित भागांची निवड करून तेथे सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने ग्रोथ सेंटर (औद्योगिक विकास केंद्र) निर्माण केले आहेत. त्यात जवळ तापी नदी, सुरत-भुसावळ रेल्वेमार्ग, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग असल्याने नरडाणा-बाभळे शिवार ग्रोथ सेंटरसाठी निवडले गेले. १९९४ ला या सेंटरची स्थापना झाली.

अनेक वर्षे ग्रोथ सेंटरचा वापर केवळ निवडणुका जिंकण्यासाठी झाला. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि उदासीनतेमुळे अनेक वर्षे नरडाणा ग्रोथ सेंटरकडे उद्योजक फिरकलेच नाहीत. परिणामी, रोजगार उपलब्धी, उद्योग-व्यवसायांना चालना मिळण्याचे स्वप्न धूसर होत गेले. नंतर रोजगारनिर्मितीचा रेटा वाढल्याने २००० पासून सरासरी ६५३ हेक्टरवरील ग्रोथ सेंटर परिसरात पायाभूत सुविधांचा विकास होण्यास सुरुवात झाली.

सेंटर स्थापनेत नरडाण्यासह वारूड, जातोडा, वाघोदे, बाभळे, वाघाडी खुर्द व वाघाडी बुद्रुक येथील शेतकऱ्यांची जमिनी दिल्या आहेत. ग्रोथ सेंटरच्या फेज-३ मधील विस्तारीकरणात औद्योगिक विकास महामंडळाने २०११ पासून हजारांवर शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत ‘भूसंपादनात समाविष्ट’, असा शेरा सात-बारावर मारला. त्यामुळे १४ वर्षांपासून शेतकऱ्यांना औद्योगिक विकास महामंडळाकडून जमिनीचा मोबदलाही मिळत नाही व सात-बारावरील शिक्केही काढले जात नाहीत अशी स्थिती आहे.

गुंतवणुकीवर परिणाम

केंद्र पुरस्कृत नरडाणा ग्रोथ सेंटरचा धीम्या गतीने विकास झाला. यात एक हजारांवर शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लागू शकलेला नाही. त्यामुळे ग्रोथ सेंटरच्या फेज-३ मधील साडेसहाशे हेक्टरचे भूसंपादन रखडले आहे. शिवाय ग्रोथ सेंटरच्या फेज-१ व फेज-२ मध्ये ३५५ हेक्टर जमीन संपादित झाली असून, पैकी सरासरी ४० टक्क्यांवर जमिनीवर प्रत्यक्षात उद्योग सुरू आहेत. उर्वरित भूखंड विनाप्रकल्प काही व्यक्ती, भूमाफियांनी अडकवून ठेवले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT