E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Crop Registration : परभणी जिल्ह्यातील ८४८ गावांमध्ये एकूण ५ लाख ७२ हजार ३५९ शेतकरी खातेदार असून त्यांच्या शेती खात्यांचे क्षेत्र ६ हजार ७ हजार ५६९ हेक्टर आहे.
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२४) खरीप हंगामात सोमवारपर्यंत (ता. २३) परभणी जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ६१५.३६ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यात २ लाख ८४ हजार ४८७.९४ हेक्टर मिळून एकूण ७ लाख ३४ हजार १०३.३३ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली आहे.

यंदाच्या ई-पीकपाहणीत या दोन जिल्ह्यांतील ५ लाख ६७ हजारांवर शेतकरी खातेदार सहभागी झाले. शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणीची मुदत सोमवारी (ता. २३) संपली असून तलाठी स्तरावरील ई-पीकपाहणीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

E Peek Pahani
E-Peek Pahani : आजपासून ई-पीक पाहणीसाठी विशेष मोहीम

परभणी जिल्ह्यातील ८४८ गावांमध्ये एकूण ५ लाख ७२ हजार ३५९ शेतकरी खातेदार असून त्यांच्या शेती खात्यांचे क्षेत्र ६ हजार ७ हजार ५६९ हेक्टर आहे. जिल्ह्यात यंदा खरिपाची ५ लाख २७ हजार ९०१ हेक्टर पेरणी झाली आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) जिल्ह्यात ३ लाख ५२ हजार २४४ शेतकरी खातेदारांनी ४ लाख ४७ हजार २९५.३० हेक्टर क्षेत्रावरील ई-पीकपाहणी केली. चालू पड क्षेत्र २ हजार ३२० हेक्टर असून ते मिळून एकूण ४ लाख ४९ हजार ६१५ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली.

जिल्ह्यात ३ लाख ५७ हजार ७८८ शेतकरी खातेदार असून त्यांच्या शेती खात्यांचे क्षेत्र ४ लाख ५१ हजार ४२५ हेक्टर आहे. जिल्ह्यात यंदा ३ लाख ५४ हजार ४८५ हेक्टरवर (९८.१८ टक्के) पेरणी झाली आहे. सोमवारपर्यंत (ता. २३) मोबाइल अॅपद्वारे २ लाख १४ हजार ७१० व तलाठी स्तरावर १४६ मिळून २ लाख १४ हजार ८५६ शेती खात्यांच्या २ लाख ८४ हजार ४८७ हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी झाली आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : ई-पीकपाहणीसाठी मुदतवाढ

या दोन जिल्ह्यांत ई-पीकपाहणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. ई-पीकपाहणी मोबाइल अॅपची माहिती व जनजागृती करण्यात आली. सर्व शेतकरी खातेदारांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती त्यांनी स्वतः गाव नं ७-१२ वर नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. प्रत्येक गावातील किमान २०० शेतकऱ्यांची ई-पीकपाहणी नोंदणी पूर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले होते.

परभणी-हिंगोली ई-पीकपाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका खरीप पेरणी क्षेत्र ई-पीकपाहणी क्षेत्र शेतकरी संख्या

परभणी ९३६५९ ८१५७६ ६०९४३

जिंतूर ९३९४५ ८३०३४ ५८८३८

सेलू ६२७४३ ४८९२६ ३६८८६

मानवत ४३५२५ ३६०५० २६४१९

पाथरी ४३४७९ ३९७९२ ३०४३५

सोनपेठ ३४०९५ ३०७९५ २४०७९

गंगाखेड ५८४१२ ४५२२० ३८१७५

पालम ४५४९० ३७८०९ ३४२५९

पूर्णा ५१२९२ ४६४०७ ४१६१७

हिंगोली ७६८७७ ५५४७८ ३९०८४

कळमनुरी ७०५९८ ५९९३५ ४५६९२

वसमत ६३६४९ ५७०७५ ४८३७९

औंढा नागनाथ ५७९५५ ४५३९६ ३७४२४

सेनगाव ८५४०६ ६६६०२ ४८३७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com