Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : शिराळा तालुक्यात पावसाचा जोर मंदावला

Monsoon Rain : शिराळा तालुका आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्गही वाढवल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुका आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्गही वाढवल्याने वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. बुधवारी (ता. २८) सकाळपासून शिराळा तालुका आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून जिल्ह्यातील इतर भागांत पावसाने उघडीप दिली.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एक जून ते आजअखेर ३४५६ मिलिमीटर पाऊस झाला. शिराळा तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. तर वारणा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवष्टी झाली. त्यामुळे वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला.

पाण्याची आवक वाढत असल्याने टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली असून सध्या धरणातून वक्रद्वारातून २४३० तर विद्युत गृहातून १४३० असा एकूण ३८६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर गेले असून पिके पाण्याखाली आहेत.

वारणा धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असून ३३.५४ टीएमसी म्हणजे ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, खानापूर, तासगाव या भागांत हलका पाऊस झाला. तर दुष्काळी पट्ट्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या तालुक्यांत पावसाची रिपरिप सुरू होती. जिल्ह्यात बुधवारी (ता. २८) सकाळपासून पावसाने उघडीप दिली असून शिराळा तालुक्यातील पावसाचा जोर मंदावला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT