Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain : घनसावंगीत ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण

Rain Update : घनसावंगी तालुक्यात चार ते पाच दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले, ओढे यांना चांगले पाणी आले आहे.

Team Agrowon

Ghansawangi News : घनसावंगी तालुक्यात चार ते पाच दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले, ओढे यांना चांगले पाणी आले आहे. शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत.

चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे चोवीस तासांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

परिणामी परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे. घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत ५१४.८० मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागातून देण्यात आली. रामसगाव, शेवता या भागांत ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी आले.

त्याचबरोबर मच्छिंद्रनाथ चिंचोली, घनसावंगी, मांदळा, बोडखा यांसह अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी मागील आठवड्यापासून शेतातील पिकांना खत देणे, कीटकनाशकांची फवारणी, खुरपणी, औताच्या पाळ्या अशी अनेक कामे करून ठेवली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT