Vijay Javandhia Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season MSP: हमीभावातील वाढ म्हणजे नुसता आकड्यांचा खेळ

Vijay Jawandhia: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी जाहीर केलेले हमीभाव हे महागाईच्या तुलनेत तुटपुंजे असून, केवळ आकड्यांचा खेळ असल्याची टीका शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे.

Team Agrowon

Nagpur News: केंद्र सरकारने २०२५-२६ या वर्षाकरिता खरीप हंगामातील १४ विविध शेतीमालांसाठीचे हमीभाव बुधवारी (ता. २८) जाहीर केले आहेत. परंतु हा केवळ आकड्यांचा खेळ असून महागाईच्या तुलनेत हमीदरात केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याचा आरोप शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केला आहे.

श्री. जावंधिया म्हणाले, की केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या हमीभावामध्ये मुगाच्या हमीदरात गेल्या वर्षीच्या तुलनेत अवघी एक टक्‍का वाढ केली आहे. २०२४-२५ या वर्षात मुगाची किंमत ८६८२ रुपये होती. २०२५-२६ या वर्षात ८७६८ रुपये असा हमीभाव मुगाला मिळणार आहे. तूर, उडीद यांच्या हमी किमतीत अवघी सहा ते आठ टक्‍के इतकीच वाढ जाहीर केली आहे. तुरीला यापूर्वी ७५५० रुपयांचा हमीभाव असताना यंदाच्या हंगामात तो ८००० रुपये करण्यात आला आहे.

बाजारात सद्यःस्थितीत ६८०० ते ७००० रुपये याप्रमाणेच तुरीचे व्यवहार होत आहेत. सोयाबीनचे देखील असेच असून, ४८९२ रुपये क्‍विंटलचा हमीभाव याला जाहीर करण्यात आला होता. या वर्षी त्यात ८.५ टक्‍के वाढ करून हा दर ५३८२ असा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूक काळात सोयाबीनला ६००० रुपयांचा दर देण्याचे जाहीर केले होते.

असे असताना बाजारात सोयाबीनचे व्यवहार ४००० रुपयांनी होत आहेत. कापसाचेही तसेच असून मध्यम धाग्याकरिता ७१२१ रुपये दर होता त्यात वाढ करून तो आता ७७१० रुपये केला आहे. लांब धागा कापूस ७५२१ रुपयांवरून ८००० रुपये क्‍विंटल केला आहे. कापसाला देखील बाजारात ७००० ते ७१०० रुपये इतकाच दर मिळाला.

पीएम कार्यालयाचा खर्च किती पटीने वाढला?

२०१४ ते २०२४-२५ या दहा वर्षांत शेतीमालाच्या हमीभावात ८० ते १०० टक्‍के वाढ झाली आहे, असे मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याचवेळी पंतप्रधान कार्यालयाचा खर्च किती पटीने वाढला हे देखील त्यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी देखील श्री. जावंधिया यांनी केली आहे.

वाढीव हमीभावासाठी दोन लाख सात हजार कोटींची केलेली तरतूद ही केवळ दिशाभूल आहे. शासनाने हे पैसे शेतकऱ्यांच्या जन-धन खात्यात जमा करावे किंवा पीएम किसान सन्मान निधीसोबत देण्याची व्यवस्था करावी.
विजय जावंधिया, शेतकरी नेते, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT