Ravikant Tupkar  agrowon
ॲग्रो विशेष

Edible Oil Export Duty : खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढीने सोयाबीन भाववाढीस होणार मदत

Team Agrowon

Buldana News : सोयाबीन दरवाढीसाठी केलेल्या अन्नत्याग आंदोलनासह वेळोवेळीच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. केंद्र सरकारकडून महत्त्वाची मागणी मान्य करण्यात आली आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची आपण वारंवार मागणी रेटून धरली होती. सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवल्याने सोयाबीन भाववाढीस मदत होईल, असे मत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.

सरकारने रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १३.७५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के केले आहे. यामुळे भावात थोडी वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात २० ते ३० टक्क्यांची वाढ करावी ही मागणी आपण वारंवार लावून धरली होती. सिंदखेडराजा येथे गेल्या आठवड्यात केलेल्या अन्नत्याग आंदोलनातही हीच प्रमुख मागणी होती.

११ सप्टेंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीतसुद्धा या मागणीवर आपण ठाम होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीतूनच दिल्लीत संपर्क साधत हा मुद्दा पटवून दिला होता. गेल्या वर्षीदेखील वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना भेटून मागणी लावून धरली होती. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा लावून धरला होता. आता केंद्र सरकारने शुक्रवारी (ता. १३) या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

सोयाबीन डीओसीच्या निर्यातीला प्रोत्साहन अनुदान हवे

सोयाबीन दरवाढीसाठी सोयाबीनच्या डीओसीच्या निर्यातीला प्रोत्साहन अनुदान देणे गरजेचे आहे. हा निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सोयाबीनची डीओसी निर्यात केली तरच सोयाबीनच्या दरात चांगली वाढ होईल. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणीही तुपकरांनी केली आहे.

संत्रा नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रमाणीकरणासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा राज्यातील ३३ हजार ३५६ पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर संत्रा-मोसंबीच्या गळतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरली होती, त्यानुसार संत्रा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Boar Control : रानडुक्कर नियंत्रणासाठी पर्यावरणस्नेही पद्धती

Vermicompost : अभियांत्रिकी प्राध्यापकाची दर्जेदार गांडूळ खत निर्मिती

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांचा डेटा बेस तयार करा, जिल्हाधिकाऱ्यांची साखर कारखान्यांना सूचना

Ginger Crop : आले पिकावर ‘कंदकुज’चा प्रादुर्भाव, हजारो हेक्टर पिकाला फटका

Spices Industry : मसाले उद्योगात ‘सुजलाम्’ची भरारी

SCROLL FOR NEXT