Sanjay Rathod Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : पालकमंत्र्यांनी घेतला कृषी विभागाचा ‘क्लास’

Crop Insurance : शासन निर्णयानुसार कृषी विभाग आणि कंपनीने संयुक्त सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देणे गरजेचे होते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : शासन निर्णयानुसार कृषी विभाग आणि कंपनीने संयुक्त सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ देणे गरजेचे होते. तसे झालेले दिसत नाही. त्यामुळे पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कृषी विभाग तसेच पीकविमा कंपनीने दुर्लक्ष केल्याचे म्हणत पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषी तसेच पीकविमा कंपनीचे कान टोचले.

पीकविमा रक्कम वाटपात मोठी अनागोंदी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पीकविम्याची अत्यंत तोकडी मदत मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

कृषी विभाग आणि विमा कंपनीने दुर्लक्ष केल्याचे खडेबोल पालकमंत्री राठोड यांनी सुनावले. या संदर्भात येत्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हा हा शेतकऱ्यांबाबतीत संवेदनशील आहे. शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय शासन घेत आहे.

पीकविमा रकमेच्या बाबतीत शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यात रिलायन्स विमा कंपनीला बदलून इतर जिल्ह्यात ज्या विमा कंपनी काम करताहेत, त्यांना काम देता येईल का, किंवा शासकीय यंत्रणेमार्फत पीकविमा रक्कम अदा करता येईल का, याबाबत माहिती घेण्यात आली. तसा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला कृषी संचालक दिलीप झेंडे, सहसंचालक विनय आवटे, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, पराग पिंगळे, विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

‘अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वेक्षण करावे’

मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात मॉन्सूनोत्तर पाऊस पडला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानाचे कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वेक्षण करावे. शेतकऱ्यांना पीक नुकसानाच्या पूर्वसूचना भरण्याचे आवाहन करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Fire Prevention Plan: वणव्यांच्या प्रतिबंधासाठी १३२ किलोमीटरची जाळरेषा

Indian Journalism: बारकावे शोधून पत्रकारिता करावी: ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

Agri College Administration Changes: कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महानंद माने यांची उचलबांगडी

Water Conservation: भूजल पुनर्भरणाला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे : नितीन गडकरी

Ai in Farming: प्रतापराव पवार यांचे कृषी ‘एआय’ वापराचे काम उल्लेखनिय : गडकरी

SCROLL FOR NEXT