Animal Husbandry
Animal Husbandry Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : देशात पशूपालनाचा वाढता आलेख...

Team Agrowon

डॉ. तेजस शेंडे, डॉ. अभिजित बाराते

Livestock Management : भारतामध्ये जगामधील एकूण पशुधनापैकी साधारण १०.२३ टक्के पशुधन आढळते. पशुपालन व्यवसाय हा भारतातील एकतृतीआंश ग्रामीण लोकांच्या जगण्याचे साधन आहे. पशुपालन व्यवसायामध्ये मागच्या वर्षापेक्षा ६ टक्के एवढी वाढ झाली असून ती शेती व्यवसायापेक्षा जवळपास १.५ पट आहे.

पशुपालन व्यवसायाचा भारताच्या एकूण उत्पादनात पशुउत्पादनांचा वाटा जवळपास १२.२७ दशलक्ष रुपये आहे. हा वाटा भारताच्या एकूण उत्पादनाच्या ५.७३ टक्के आणि एकूण शेती उत्पादनाच्या ३०.१९ टक्के आहे. भारत देश दूध उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे. जागतिक एकूण दूध उत्पादनाच्या २३ टक्के म्हणजेच २३० दशलक्ष टन एवढे दूध उत्पादन करतो. भारताचा जगामध्ये अंडी उत्पादनामध्ये तिसरा व मांस उत्पादनामध्ये आठवा क्रमांक लागतो. २०२२-२३ या वर्षात भारतातून वेगवेगळ्या पशू व इतर पशू उत्पादनांची ५७.३३ लाख कोटी रुपयांची आयात करण्यात आली आणि ३६.२० लाख कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली.

देशातील पशूंची संख्या

भारताच्या २०१९ च्या पशू जनगणनेनुसार एकूण पशूंची संख्या ५३६. ७६ दशलक्ष एवढी आहे. यामध्ये १२५. ७५ दशलक्ष दुभत्या जनावरांचा समावेश होतो. प्रमुख उत्पादन करणाऱ्यांमध्ये गायवर्गीय जनावरांची संख्या ३०३.७६ दश लक्ष, म्हशीची संख्या १०९.८५ दश लक्ष, मेंढ्यांची संख्या ७४.२६ दश लक्ष, शेळ्यांची संख्या १४८.८८ दश लक्ष, वराहांची संख्या ९.०६ दशलक्ष आहे. मोकाट गाईंची संख्या सुमारे ५.०२ दशलक्ष असून श्वानांची संख्या १५.३० दशलक्ष आहे.

भारतामध्ये पशुंपासून मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये दूध, अंडी, मांस व लोकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामध्ये २३०.५८ दशलक्ष टन दूध, १३८.३८ कोटी अंडी, ९.७७ दशलक्ष टन मांस आणि ३३.६१ दशलक्ष किलो लोकर मिळते. ज्याची प्रति व्यक्ती उपलब्धता दूध ४५९ ग्रॅम प्रतिदिन आहे. मात्र मानकांप्रमाणे २८० ग्रॅम प्रति व्यक्ती प्रतिदिन असावी. १०१ अंडी प्रतिव्यक्ती आहे जी १८२ अंडी प्रति व्यक्ती प्रति वर्ष असावी. ७.१० किलो मांस प्रति व्यक्ती प्रतिवर्ष एवढी उपलब्धता आहे की जी ११ किलो प्रति व्यक्ती प्रतिवर्ष असावी. दूध उत्पादनामध्ये भारत देश परिपूर्ण असून अंडी आणि मांसाची प्रति व्यक्ती उपलब्धता मानकांपेक्षा कमी आहे.

मांस उत्पादन

देशात मांस उत्पादनामध्ये २०२१-२२ च्या तुलनेने ५.१३ टक्के आणि चिकन उत्पादनामध्ये ४.५२ टक्के वाढ दिसून येते. मांस उत्पादनात उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक (१२.२० टक्के) लागतो. परंतु प्रतिव्यक्ती मांसाची उपलब्धता तेलंगणा राज्यात २८.५१ किलो प्रति वर्ष आहे.

भारताच्या एकूण मांस उत्पादनात अर्धा वाटा चिकन त्यानंतर म्हैस (१७.६१ टक्के) आणि शेळी (१४.४७ टक्के) यांचा आहे.

महाराष्ट्राचा चिकन उत्पादनात प्रथम क्रमांक आहे. भारतात मांस व मांसावर प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा देशाच्या एकूण पशुत्पादनाच्या २४.३५ टक्के वाटा आहे. भारतामध्ये मांस व मांस प्रक्रिया पायाभूत सुविधांमध्ये अपेडा नोंदणीकृत जवळपास ७० एकात्मिक पशुवधगृह, १३ मांस प्रक्रिया उद्योग, सुमारे २५ हजार मटण विक्री दुकाने आहेत.

भारतातून २२-२३ या वर्षांत २६ हजार कोटी रुपये किमतीचे जवळपास ३० लाख टन मांस आणि मांसाचे उपपदार्थ निर्यात झाले. मागच्या वर्षी मांस उत्पादनाच्या वाढीचा दर (६३.०८ टक्के) सिक्कीम राज्यात सर्वात जास्त आढळला.

लोकर उत्पादन

वर्ष २२-२३ मध्ये भारतामध्ये ३३.६१ दशलक्ष किलो लोकर उत्पादन होते. जे मागच्या वर्षीच्या लोकर उत्पादनापेक्षा २.१२ टक्के जास्त होते. भारतामध्ये सर्वात जास्त म्हणजे ४७.९८ टक्के लोकर उत्पादन राजस्थानात होते. दुसरा क्रमांकावर जम्मू आणि कश्मीर (२२.५५ टक्के) राज्य आहे. वार्षिक लोकर उत्पादनाच्या वाढीचा दर (३५.७५ टक्के) अरुणाचल प्रदेशात आढळला.

अंडी उत्पादन

वर्ष २२-२३ मध्ये भारतातील एकूण अंडी उत्पादन १३८.३८ अब्ज एवढे होते, जे मागच्या वर्षीच्या अंडी उत्पादनापेक्षा ६.७७ टक्के एवढे जास्त होते.

सर्वात जास्त २०.१३ टक्के अंडी उत्पादन आंध्रप्रदेश राज्यात आहे. तेथे वार्षिक प्रतिव्यक्ती ५२६ अंडी उपलब्धता आहे. दुसरा क्रमांक १२.२० टक्के तमिळनाडू राज्याचा आहे. मागच्या वर्षी अंडी उत्पादनाच्या वाढीचा दर (२०.१० टक्के) पश्चिम बंगाल या राज्यात सगळ्यात जास्त आढळला.

दूध उत्पादन

देशातील एकूण २३०.५८ दशलक्ष टन दूध उत्पादनापैकी १५.७२ टक्के दूध उत्पादन उत्तरप्रदेश राज्यात होते. जवळपास ४५ टक्के दूध उत्पादन म्हशींपासून मिळते. पंजाबमध्ये प्रति दिन प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता १,२८३ ग्रॅम आहे. विदेशी गाईंमध्ये प्रति जनावर दूध उत्पादन क्षमता सरासरी ११.४२ किलो, संकरित गाईंमध्ये ८.४१ किलो आणि देशी गाईंमध्ये ४.१७ किलो प्रतिदिन आहे, म्हशींमध्ये ६.०६ किलो आणि शेळ्यांमध्ये ०.५० किलो प्रतिदिन आहे. मागच्या वर्षी दूध उत्पादनाच्या वाढीचा दर (८.७६ टक्के) कर्नाटक राज्यात सर्वांत जास्त आढळला.

डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५

(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Session 2024 : मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका; आमदारांसह मंत्र्यांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Tax on Robot : यंत्रमानवांवर कर आकारण्याचा इरादा

Nilesh Lanke Protest : विखेंच्या आश्वासन, लंकेंचं आंदोलन स्थगित; जयंत पाटलांच्या मध्यस्तीनंतर निर्णय

Indian Politics : दोघांमधील संघर्षाला अवास्तव महत्त्व

Maize Market : मक्यातील विक्रमी तेजी टिकून राहणार का?

SCROLL FOR NEXT