PDKV  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV : ‘पंदेकृवि’च्या बुलडाणा येथील कृषी महाविद्यालयात पदनिर्मितीस मान्यता

Agriculture College Approval of Post Creation : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील कृषी महाविद्यालयासाठी पदनिर्मितीस शासनाने मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बुलडाणा येथील कृषी महाविद्यालयासाठी पदनिर्मितीस शासनाने मंजुरी दिली आहे. अनेक दिवसांपासून रेंगाळेला हा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत बुलडाणा येथे ६० विद्यार्थी क्षमतेचे भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालय सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून चालवले जात आहे. या महाविद्यालयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत ९ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ४५ शिक्षक वर्गीय, ४३ शिक्षकेत्तर अशी एकूण ८८ पदे निर्माण करण्यास उच्चाधिकार सचिव समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता शासनानेही या पदनिर्मितीस मान्यता दिली आहे.

या महाविद्यालयासाठी सहायोगी अधिष्ठाता एक, तीन प्राध्यापक, आठ सहयोगी प्राध्यापक, ३३ सहायक प्राध्यापक अशी एकूण ४५ शिक्षकवर्गीय पदे राहणार आहेत. तर सहायक कुलसचिव एक, सहायक नियंत्रक एक, वरिष्ठ संशोधन सहायक सहा, कनिष्ठ संशोधन सहायक ६, कृषी सहायक ८, शाखा अधिकारी १, वरिष्ठ लिपिक ४, कनिष्ठ लिपिक ४, वीजतंत्री १, ग्रंथालय सहायक १, प्रयोगशाळा सहायक १० अशी एकूण ४३ पदांना मान्यता मिळाली आहे. आता कृषी विद्यापीठस्तरावरून भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे सांगितले जात आहे.

माजी कृषिमंत्र्यांच्या नावाने महाविद्यालय

बुलडाणा जिल्ह्यात शासनाचे हे कृषिमहाविद्यालय होण्यासाठी बराच विलंब लागला. मंजुरीनंतरही जागेच्या निवडीत बरीच वर्षे गेली. पांडुरंग फुंडकर हे कृषिमंत्री असताना त्यांनी यासाठी पाठपुरावाही केला. गेल्या वर्षात सुरू केलेल्या कृषी महाविद्यालयाला त्यांचेच नाव देण्यात आले.

भाऊसाहेब फुंडकर कृषी महाविद्यालयामुळे कृषी शिक्षणाची सोय निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांची पदनिर्मितीनंतर आता महाविद्यालयाच्या इमारत निर्मितीलाही कधी मुहूर्त मिळतो, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT