Katepurna Sanctuary Agrowon
ॲग्रो विशेष

Katepurna Sanctuary : काटेपूर्णा अभयारण्यातील वनरक्षक करणार पक्षांची ‘ई-बर्ड’वर नोंद

Bird Registration : या कार्यशाळेबद्दल अधिक माहिती देताना निसर्ग कट्टाचे अमोल सावंत म्हणाले, की जंगलामध्ये कार्यरत असणारे वनरक्षक, वनमजूर व गाईड हे जंगलात असतात.

Team Agrowon

Washim News : निसर्ग अभ्यासक मारोती चितमपल्ली व थोर पक्षितज्ज्ञ सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने निसर्ग कट्टा (अकोला), वन्यजीव विभाग व महाराष्ट्र पक्षिमित्र ‌यांच्या संयुक्त विद्यमाने काटेपूर्णा अभयारण्यातील वनरक्षक, वनमजूर व गाईड यांच्यासाठी पक्षी निरीक्षण व माहिती संकलन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेबद्दल अधिक माहिती देताना निसर्ग कट्टाचे अमोल सावंत म्हणाले, की जंगलामध्ये कार्यरत असणारे वनरक्षक, वनमजूर व गाईड हे जंगलात असतात. पक्ष्यांविषयी माहिती ई-बर्ड या अॅपद्वारे संकलन करून ती माहिती जगाला उपलब्ध व्हावी तसेच जगातील पक्षी अभ्यासकांना आपल्या भागातील पक्ष्यांची माहिती व्हावी यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेस १३० पक्ष्यांचे फोटो व नावे असलेले फोल्डर देण्यात आले. या फोल्डरवरून त्यांना पक्षी ओळखणे व ई-बर्ड अॅपवर माहिती अपलोड करणे सोपे होईल .

काटेपूर्णा अभयारण्यील कार्यशाळेत पक्षिमित्र डॉ. संतोष सुरडकर ( विभाग प्रमुख, वनस्पती शास्त्र, जी.एन. ए. कॉलेज बार्शीटाकळी) यांनी ई-बर्ड या अॅप बद्दलची माहिती व काटेपूर्णा अभयारण्यातील पक्षी या विषयावर यांनीही माहिती दिली.

अमोल सावंत यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती दिली. अकोला वन्यजीव विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन वनरक्षक अमोल पोटे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पक्षिमित्रचे सदस्य अभिजित चिम व गाईड नागसेन आकोडे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता; तीन शासन निर्णय प्रसिद्ध

Sugarcane Payment : उसाचे पैसे थकविल्याने शेतकऱ्यांचा संताप

Marathwada Rainfall : मराठवाड्यात अपेक्षेच्या तुलनेत पावसाची तूटच

Agriculture Scheme: बोअरिंगसाठी शेतकऱ्यांना मिळणार ४० हजारांचे अनुदान

Tree Geo Tagging : सातारा जिल्ह्यात ५० लाख झाडांचे होणार जिओ टॅगिंग

SCROLL FOR NEXT