Godavari River  Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Update : गोदाकाठचा पूर ओसरला

Godavari River : नद्यांच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरण समूहातून गोदावरीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता.

Team Agrowon

Nashik News : गेल्या आठवडाभरापासून नाशिक, इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, तसेच नद्यांच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरण समूहातून गोदावरीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला होता.

परिणामी निफाड तालुक्याच्या गोदाकाठ भागात रविवारी (ता. २५) पहाटेपासून पूरस्थिती निर्माण झालेली होती. मंगळवारी उशिरापर्यंत गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली होती. तिसऱ्या दिवसानंतर हा पूर ओसरल्याने दिसून आले.

२०१६ मध्ये या काळातच पुराच्या पाण्याने गोदाकाठ भागात थैमान घातले होते. त्यानंतर २०१७-१८, २०१९ या वर्षीही या दरम्यानच पूरस्थिती निर्माण झाली होती. आता २० दिवसांत दोन वेळा पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये धास्ती आहे.

गोदावरीच्या पात्रात पाण्याची आवक वाढल्याने नदीने पात्र सोडले होते. त्यामुळे चाटोरी, नागापूर, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, गोंडेगाव, चापडगाव, मांजरगाव या गावांच्या नदीपात्राच्या शेजारी शिवारात पाणी घुसले होते.

भाजीपाला, सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गोदापात्र ओलांडल्याने नदी काठावरील बहुतांश वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्याने वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Survey: तीस टक्के क्षेत्राचे पंचनामे

Maharashtra Weather Forecast: कोकणात उष्ण, दमट हवामान शक्य

Soybean Price: नव्या सोयाबीनने केला सहा हजाराचा टप्पा पार

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

SCROLL FOR NEXT