Kolhapur Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : शेतात पुराचं पाणी, शेतकऱ्याच्या आसवांचा बांध फुटला; मुख्यमंत्र्यांकडे पूराच्या बंदोबस्ताची मागणी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेली पंधरा दिवसापासून कोल्हापुरला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी पात्र ओलांडल्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान होण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. यादरम्यान शिरोळ तालुक्यात पंचगगा आणि कृष्णा नदीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर शेतात आलेल्या पुरामुळे एका शेतकऱ्याच्या आसवांचा बांध फुटल्याचा आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीसाठी आर्त हाक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे जिल्ह्यात सध्या याची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनाने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात येणाऱ्या पुराचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कोल्हापूरची पंचगंगा नदी आणि सांगलीतून वाहणारी कृष्णा यांना प्रत्तिवर्षी मुसळधार पावसामुळे पूर येतो. २०१९ आणि २०२२ मध्ये येथे महापूर आला होता. ज्यामुळे अनेकांना याचा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे पुरामुळे चिखल झाला होता. यंदाही १५ दिवसात पडलेल्या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीला पूर आला. तसेच अलमट्टी धरणातून सुरूवातीलाच विसर्ग न वाढवल्याने दोन्ही नद्यांच्या पाण्याला फूग आल्याने पुराचे पाणी शिरोळ तालुक्यात शिरले. सध्या कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. मात्र शिरोळ तालुक्यात अद्यापही पूरस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे. यातूनच तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून थेट मुख्यमंत्र्यंनाच पुराबाबत साकडे घातले आहे.

तालुक्यातील शेती दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने आम्हाला सरकारी अनुदान नको, पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा, अशी विनवणी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने केली आहे. तसेच अश्रू नयनांनी येथे दरवर्षी पूर येतो, पुढेही येईल. आपण सरकार म्हणून मदतही करणार. पण अशी मदत करून आम्हाला लाचार करणार आहात का अशी विचारणा शेतकऱ्यांनी शिंदे यांना केली आहे.

फक्त आठ दिवस पाऊस पडल्यावर पूराची स्थिती अशी आहे. जर हाच पाऊस पंधरा दिवस झाला तर काय अवस्था होईल याचा विचार मुख्यमंत्री शिंदे यांनी करावा. पूर येतो म्हणून सरकारी अनुदान देण्यापेक्षा पूर कसा रोखता येईल, याकडे लक्ष द्या, अशी मागणी शेतकऱ्याने शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच सततच्या होणाऱ्या शेतीच्या नुकसानीमुळे आता आम्हाचा गळफास घेण्याचा विचार येतो आहे, तो थांबवा. आमच्या आसवांचा बांध थांबवा अशी मागणी शेतकऱ्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Power : पश्चिम विदर्भातील ६ हजार घरांवर सौर ऊर्जानिर्मिती

Suryaghar Yojana : छत्रपती संभाजीनगर परिमंडलात ३६५३ जणांना सूर्यघर योजनेचा लाभ

Majhi Ladki Bahin Yojana : तुम्ही ताकद द्या, ‘लाडकी बहीण’चा निधी वाढवू

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT